
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेनंतर शुभमन गिल, रिषभ पंतला धक्का
चांगली कामगिरी करूनही आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये घसरण
यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदरची झेप
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अत्यंत रोमहर्षक कसोटी मालिकेनंतर आयसीसीनं नव्याने जागतिक कसोटी क्रमवारीची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात काही भारतीय खेळाडूंना जोरदार झटका बसला आहे. तर काही खेळाडूंनी जबरदस्त झेप घेतली आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल यानं चांगली कामगिरी करूनही तगडा झटका मिळाला आहे. रिषभ पंतचंही नुकसान झालंय. तर सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदरच्या क्रमवारीत सुधारणा झालीय.
नव्या कसोटी क्रमवारीनुसार, शुभमन गिल टॉप १० मधून बाहेर पडला आहे. चार स्थानांची घसरण झाली असून, तो १३ व्या स्थानी आला आहे. तर रिषभ पंतची आठव्या स्थानी घसरण झालीय. रवींद्र जडेजा देखील दोन स्थानांनी घसरला आहे. आता तो ३१ व्या स्थानी पोहोचलाय. सलामीवीर केएल राहुल हा देखील चार पायऱ्या घसरला असून, ४० व्या स्थानी पोहोचला आहे.
जॅमी स्थिमच्या क्रमवारीत आठ स्थानांनी घसरण झाली असून, तो २१ व्या स्थानी आला आहे. ओली पोप आणि जेकब बेथेल याचं देखील नुकसान झालं आहे. तर इंग्लंडचा जो रूट पहिल्या स्थानी असून, हॅरी ब्रुक हा दुसऱ्या स्थानी आहे.
भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल क्रमवारीत चमकला आहे. तीन स्थानांच्या वाढीसह पाचव्या क्रमांकावर आला आहे. इंग्लंडचा जॅक क्रॉली ४२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरनेही ४ स्थानांची झेप घेतली आहे. तो आता ६१ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत सर्वच फलंदाजांनी खोऱ्यानं धावा ओढल्या आहेत. त्यामुळं भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंचं वर्चस्व या कसोटी क्रमवारीत दिसून येत आहे. दुसरीकडं अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये खूप काही बदल झालेला नाही. रवींद्र जडेजा हा पहिल्या स्थानी कायम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.