Shreyas Iyer Fitness Update  Saam TV
Sports

IND VS AUS 4th test: ... म्हणून श्रेयस अय्यर फलंदाजी करण्यासाठी नाही आला, BCCI ने दिली मोठी अपडेट

Shreyas iyer: श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी का आला नाही. आता याबाबत बीसीसीआयने मोठी अपडेट दिली आहे.

Ankush Dhavre

Shreyas iyer injury update: बॉर्डर गावसकर ट्रॉफितील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४८० धावा केल्या आहेत.

तर प्रत्युत्तरात भारतीय संघाने देखील जोरदार कामगिरी केली आहे. दरम्यान सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला.

रवींद्र जडेजा स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर केएस भरत फलंदाजी करण्यासाठी आला. अनेकांना प्रश्न पडला असेल की, श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी का आला नाही. आता याबाबत बीसीसीआयने मोठी अपडेट दिली आहे. (Latest sports updates)

तिसऱ्या दिवशी शुभमन गिल बाद झाल्यानंतर ठरलेल्या क्रमानुसार श्रयेस अय्यर फलंदाजीला येईल असे वाटले होते. मात्र रवींद्र जडेजा फलंदाजी करण्यासाठी आला. त्यानंतर चौथ्या दिवशी जेव्हा रवींद्र जडेजा बाद होऊन माघारी परतला, त्यावेळी केएस भरत फलंदाजी करण्यासाठी आला.

आता श्रेयस अय्यर बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर श्रेयस अय्यरला पाठदुखीचा त्रास जाणवल्याचे समोर आले आहे.

तर सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आले आहे. तो फलंदाजी करण्यासाठी येणार की नाही, याबाबत कुठलीही अपडेट समोर आली नाहीये.

ऑस्ट्रेलियाने उभारला ४८० धावांचा डोंगर..

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती. ऑस्ट्रेलिया संघाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक १८० धावांची खेळी केली.

तर कॅमरुन ग्रीनने ११४ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. शेवटी खालच्या फळीतील फलंदाजांनी देखील मोलाचे योगदान दिले. शेवटी टॉड मर्फीने ४१ आणि लायनने ३१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने ४८० धावांचा डोंगर उभारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT