Team India Captaincy: कसोटी संघाचा कर्णधार म्हणून रोहित पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. आगामी वेस्टइंडिज विरुद्ध होणारी कसोटी मालिका ही त्याची कसोटी कर्णधार म्हणून शेवटची मालिका असू शकते. नुकताच पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आता बीसीसीआय आणि निवडकर्ते नव्या कर्णधाराच्या शोधात आहेत. अशात शुभमन गिल आणि रिषभ पंतसारख्या युवा खेळाडूंचं नाव पुढे येत आहे. जे भविष्यात संघाला पुढे घेऊन जाऊ शकतात. मात्र या संघात आणखी एक खेळाडू आहे जो कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.
हा फलंदाज होऊ शकतो भारतीय संघाचा भावी कर्णधार..
मुंबईकर श्रेयस अय्यरने भारतीय संघासाठी आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. अजिंक्य रहाणे संघाबाहेर झाल्यानंतर त्याला संघात स्थान मिळालं होतं. २०१८ मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा सांभाळली होती. आपल्या नेतृत्वाखाली त्याने २०२० मध्ये दिल्लीला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवलं होतं.
त्यानंतर २०२२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे आता भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचं नाव देखील पुढे येत आहे. (Latest sports updates)
श्रेयस अय्यरचा दमदार रेकॉर्ड..
श्रेयस अय्यरने भारतीय संघासाठी आतापर्यंत १० कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४४.४० च्या सरासरीने फलंदाजी करत ६६६ धावा केल्या आहेत.श्रेयसने भारतीय संघासाठी फलंदाजी करताना १ शतक तर ५ अर्धशतके झळकावली आहेत. टी -२० वर्ल्ड कप २०२१ स्पर्धा झाल्यानंतर राहुल द्रविड यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर श्रेयस अय्यरची भारतीय संघात एन्ट्री झाली होती.
राहुल द्रविडचा हा निर्णय योग्य ठरला. त्याला ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. आता त्याची कामगिरी पाहता त्याला भावी कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. तो येणाऱ्या काळात भारतीय संघासाठी आणखी दमदार कामगिरी करू शकतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.