Team India  Saam Tv
Sports

IND VS AUS 4th test: टीम इंडियाला मोठा धक्का! संघातील प्रमुख फलंदाज अहमदाबाद कसोटीतून बाहेर..

हा सामना सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Ankush Dhavre

Shreyas iyer ruled out: बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथा कसोटी सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली आहे.

तर शेवटच्या दिवशी या सामन्याचा निकाल लागणार आहे. दरम्यान हा सामना सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. (Latest sports updates)

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यर हा अहमदाबाद कसोटीतून बाहेर झाला आहे. तो पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. भारतीय संघाचा पहिला डाव ५७१ धावांवर संपुष्ठात आला होता. मात्र श्रेयस अय्यर फलंदाजीला येऊ शकला नव्हता.

श्रेयस अय्यर हा गेले काही महिने दुखापतग्रस्त असल्याने संघाबाहेर होता. तर दिल्ल्ली कसोटीत त्याला पुनरागमन करण्याची संधी मिळाली होती. आता तो पुन्हा एकदा संघाबाहेर झाला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने केलेल्या ४८० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली होती. रोहित ३५ धावा करत माघारी परतला. मात्र शुभमन गिलने डाव सावरत १२८ धावांची खेळी केली.

तर सामन्याचा चौथा दिवस विराटने गाजवला. विराटने चौथ्या दिवशी फलंदाजी करताना करकीर्दीतील २८ वे शतक झळकावले.

त्याने या डावात १८६ धावांची खेळी केली. भारतीय संघ अडचणीत असताना अक्षर पटेलने जबाबदारी स्वीकारत ७९ धावांची खेळी केली.

या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ५७१ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

Guru Gochar 2025: पुढच्या वर्षी या राशींवर गुरुची राहणार कृपा; अडकलेला पैसा आणि नवी नोकरीही मिळू शकते

Pune News: पुण्यात बिबट्यानंतर माकडांची दहशत, सोसायटीत माकडांची घुसखोरी

SCROLL FOR NEXT