shreyas iyer with team india saam tv news
Sports

T-20 World Cup 2024: टीम इंडियाला या विस्फोटक फलंदाजाची कमतरता जाणवणार; KKR ला जिंकवून दिली ट्रॉफी

Shreyas Iyer, T-20 World Cup 2024: भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी विस्फोटक फलंदाजाला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

Ankush Dhavre

भारतीय संघाने मिशन टी -२० वर्ल्डकप २०२४ ला सुरुवात केली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू अमेरिकेत दाखल झाले असून सराव करायला देखील सुरुवात केली आहे. भारतीय संघाने २००७ मध्ये पहील्याच हंगामात आयसीसी टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर १७ वर्ष उलटून गेली आहेत, भारतीय संघाला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. दरम्यान या स्पर्धेसाठी श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. त्याने नेतृत्वासह फलंदाजीतही मोलाचं योगदान दिलं. मात्र टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. या स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांना भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे.

मात्र हे दोघेही फलंदाज जर फ्लॉप ठरले, तर भारतीय संघाच्या चिंतेत भर पडेल. कारण श्रेयस अय्यर नसल्याने मध्यक्रमात अनुभवी फलंदाज नसेल. श्रेयस अय्यरला वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. या स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने ५३० धावा केल्या होत्या.

आयपीएल फायनलमध्ये हैदराबादला पराभूत करत कोलकाताने जेतेपदाचा मान मिळवला. यादरम्यान त्याने जेव्हा जेव्हा संघाला गरज होती,त्यावेळी महत्वपूर्ण खेळी केली. टी -२० वर्ल्डकपसाठी अय्यरला भारतीय संघात स्थान देणं फायदेशीर ठरू शकलं असतं. वनडेसह टी -२० क्रिकेटमध्येही तो भारतीय संघासाठी हुकमी एक्का ठरू शकला असता. त्यामुळे भारतीय संघाला मध्यक्रमात त्याची कमतरता जाणवू शकते.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT