भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर सध्या सिडनीच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात अय्यर गंभीर जखमी झाला होता. अॅलेक्स कॅरीचा कॅच पकडताना त्याच्या बरगडीला गंभीर दुखापत झाली होती. त्याला स्प्लीन लॅकरेशन आणि अंतर्गत रक्तस्त्रावामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता, श्रेयस अय्यरने स्वतः त्याच्या दुखापतीवर एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्याने हॉस्पिटलमधून सोशल मीडियावर हेल्थ अपडेट शेअर केली आहे.
श्रेयस अय्यरने स्वतः दिली हेल्थ अपडेट
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यरला बॅकवर्ड पॉइंटवर अॅलेक्स कॅरीचा कॅच घेण्यासाठी मागे धावताना दुखापत झाली. ज्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. या घटनेत त्याच्या डाव्या बरगडीला गंभीर इजा झाली. त्यानंतर त्याला सिडनीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. सध्या श्रेयसची प्रकृती स्थिर आहे आणि तो बरा होत आहे.
श्रेयसने शेअर केली सोशल मीडिया पोस्ट
श्रेयसने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर करत आपल्या हेल्थवर अपडेट दिली आहे. तो म्हणाला, 'मी सध्या रिकव्हरी प्रोसेसमध्ये आहे, आणि दररोज बरा होत आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेम, शुभेच्छा आणि सपोर्टसाठी मी सगळ्यांचे आभार मानतो. माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद'.
अय्यर मैदानावर कधी कमबॅक करणार?
श्रेयस अय्यरच्या मैदानावर कधी पुनरागमन करेल याबद्दल सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो दोन महिन्यांपर्यंत खेळू शकत नाही. याचा अर्थ असा की तो या वर्षी कोणत्याही मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे. अय्यर अजून किती काळ हॉस्पिटलमध्ये राहील याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. बीसीसीआयने वृत्ताला दिलेल्य माहितीनुसार, श्रेयस २०२६ पर्यंत कोणत्याही मालिकेत खेळताना दिसणार नाही. सध्या श्रेयस अय्यरवर सिडनीमध्ये उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.