team india Saam TV
क्रीडा

IND vs ENG: सतत संधी मिळूनही पुन्हा तीच चुक! रोहितचा खास भिडू वाढवतोय टीम इंडियाचं टेन्शन

Shreyas Iyer: सतत संधी मिळूनही भारतीय संघातील हा फलंदाज फ्लॉप ठरतोय.

Ankush Dhavre

Shreyas Iyer, India vs England:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत श्रेयस अय्यरला अजूनही सुर गवसलेला नाही. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही तो १६ चेंडूंचा सामना करत अवघ्या ४ धावा करत माघारी परतला आहे. शॉर्ट चेंडू हा श्रेयस अय्यरचा कमजोर पक्ष राहिला आहे. विरोधी संघातील गोलंदाज त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना शॉर्ट चेंडूचा वापर करतात. या सामन्यातही तो शॉर्ट चेंडूवर बाद होऊन माघारी परतला आहे.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत निराशाजनक कामगिरी..

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात श्रेयस अय्यर खातं ही न उघडता माघारी परतला होता. अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात तो २५ धावा करत माघारी परतला होता. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याची बॅट तळपली होती.

या सामन्यात त्याने ५३ चेंडूंचा सामना करत ६२ धावांची खेळी केली होती. बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात तो पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतला. आता इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही ४ धावांवर माघारी परतला आहे.

श्रेयस अय्यर यापूर्वी देखील अनेकदा शॉर्ट चेंडूवर बाद होऊन माघारी परतला आहे. या सामन्यातही ख्रिस वोक्सने त्याच्याविरूद्ध गोलंदाजी करताना शॉर्ट चेंडूचा वापर केला. त्याच्या शॉर्ट चेंडूंच्या जाळ्यात अडकून पुन्हा एकदा श्रेयस अय्यर स्वस्तात माघारी परतला. (Latest sports updates)

ईशान किशनला संधी मिळणार का?

शुभमन गिलच्या अनुपस्थितीत ईशान किशनला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं होतं. ईशानने आतापर्यंत खेळलेल्या २७ वनडे सामन्यांमध्ये ९३३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४२.४१ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

त्याने वनडेत ७ वेळेस ५० धावांचा आकडा गाठला आहे.तर श्रेयस अय्यरबद्दल बोलायचं झालं तर, ५४ वनडे सामन्यांमध्ये त्याने १९३५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १५ वेळेस ५० धावांचा पल्ला गाठला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT