Team India black armband vs Eng
Team India black armband vs Engtwitter

IND vs ENG: टीम इंडियाचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून का खेळत आहे? जाणून घ्या कारण

Team India black armband vs Eng: जाणून घ्या काय आहे कारण.
Published on

Team India black armband vs Eng:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील २९ वा सामना सुरू आहे. लखनऊच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. इंग्लंडने भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे.

हा सामना जिंकून भारतीय संघ विजयाचा षटकार मारण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर इंग्लंडचा संघ दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

दरम्यान या सामन्यात भारतीय संघातील खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरले आहेत. काय आहे यामागचं कारण.

भारतीय संघाचे माजी फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांनी भारतीय क्रिकेटला मोलाचं योगदान दिलं आहे. बिशनसिंग बेदी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय खेळाडू दंडावर काळ्या रंगाची पट्टी घालून मैदानावर उतरले आहेत.

Team India black armband vs Eng
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध रोहित सेना लगावणार विजयाचा षटकार? इंग्लंडच्या या रेकॉर्डने वाढवलय टेन्शन

बीसीसीआयने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहीले की,'वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यात दिग्गज खेळाडू बिशनसिंग बेदी यांच्या स्मरणार्थ भारतीय संघातील खेळाडू दंडावर काळ्या रंगाची पट्टी घालून मैदानावर उतरणार आहे.'

Team India black armband vs Eng
IND vs ENG Toss: टॉस ठरणार बॉस; इंग्लंडला धुळ चारण्यासाठी टीम इंडियाने प्रथम काय करायला हवं?

बिशनसिंग बेदी यांचे २३ ऑक्टोबर २०२३ रोजी वयाच्या ७७ वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. बिशनसिंग बेदी यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी २७.३१ च्या सरासरीने २६६ गडी बाद केले होते.

तसेच वनडे कारकिर्दीबद्दल बोलयचं झालं तर, त्यांनी गोलंदाजी करताना ७ गडी बाद केले होते. बिशनसिंग बेदी हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी डावखुरे फिरकी गोलंदाज होते. यावर्षी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविंद्र जडेजाने हा विक्रम मोडून काढला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com