shreyas iyer fit again and ready to play again in ranji trophy says reports twitter
क्रीडा

Shreyas Iyer Comeback: इकडे रोहितची वॉर्निंग अन् तिकडे श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय

Ankush Dhavre

Shreyas Iyer Comeback:

भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा मैदानावर खेळताना दिसणार आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना मुंबई विरुद्ध तामिळनाडू या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात श्रेयस अय्यर मुंबईकडून खेळताना दिसणार आहे.

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना मुंबई आणि तामिळनाडू या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना येत्या २ मार्चपासून मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात श्रेयस अय्यर कमबॅक करणार आहे. एका सुत्राने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, ' श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट असून मुंबईच्या रणजी ट्रॉफीतील सेमीफायनलच्या सामन्यासाठी उपलब्ध राहणार आहे.'

भारत- इंग्लंड कसोटी मालिकेतून झाला बाहेर..

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरला संधी दिली गेली होती. मात्र तो या सामन्यात हवी तशी कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे त्याला संघाबाहेर केलं गेलं होतं. तसेच तो पाठीच्या दुखण्यानेही त्रस्त असल्याचे म्हटले जात होते. मालिकेतील २ सामन्यांमध्ये त्याला ३५,१३,२७ आणि २९ धावा करता आल्या होत्या. (Cricket news in marathi)

तामिळनाडू संघात हे खेळाडू परतणार..

सेमीफायनलच्या सामन्यासाठी तामिळनाडू संघातही अनुभवी खेळाडूंची भर पडणार आहे. मुंबईविरुद्ध होणाऱ्या या सामन्यासाठी वॉशिंग्टन सुंदर आणि साई सुदर्शन यांचं कमबॅक होणार आहे. वॉशिंग्टन सुंदरला रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघातून विश्रांती देण्यात आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना ६ मार्चपासून सुरु होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT