shreyas iyer celebrated his victory of mumbai ranji team by dancing on puneri dhol video viral  twitter
Sports

Shreyas Iyer Dance Video: दुखापतग्रस्त श्रेयसचा विजयानंतर जल्लोष! पुणेरी ढोलच्या तालावर भन्नाट डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Shreyas Iyer Dance: भारतीय संघाबाहेर असलेला श्रेयस अय्यर सध्या तुफान चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Shreyas Iyer Dance:

भारतीय संघाबाहेर असलेला श्रेयस अय्यर सध्या तुफान चर्चेत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबईने विदर्भाला नमवत ट्रॉफीवर नाव कोरलं. दरम्यान या विजयानंतर मुंबईचे खेळाडू एकच जल्लोष साजरा करताना दिसून आले. पाठीच्या दुखण्याने त्रस्त असलेला श्रेयस अय्यर देखील दुखणं विसरुन डान्स करताना दिसून आला आहे.

श्रेयस अय्यरने या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ९५ धावांची खेळी केली. त्याचं शतक अवघ्या ५ धावांनी हुकलं. या खेळीनंतर त्याला पाठदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे तो शेवटच्या दिवशी मैदानावर उतरला नव्हता.

दरम्यान मुंबईने ४२ व्या वेळेस जेतेपदावर नाव कोरल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर एकच जल्लोष करण्यात आला. संघातील खेळाडू पुणेरी ढोलच्या तालावर डान्स करताना दिसून आले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा केला गेला आहे की, तो २२ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो. (Cricket news in marathi)

श्रेयस अय्यरबाबत विचारपूस केली असता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका सुत्राने म्हटले की, ' श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त आहे. त्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागणार आहे. त्याला भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र या सामन्यांमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

केकेआरला मोठा धक्का?

श्रेयस अय्यर हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आहे. मात्र आगामी हंगामात त्याच्या खेळण्यावर प्रश्वचिन्ह आहे. गेल्या हंगामातही त्याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं होतं. या हंगामातही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. जर तो या हंगामातून बाहेर झाला तर त्याच्याऐवजी नितिश राणा संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. गेल्या हंगामातही नेतृत्वाची जबाबदारी नितिश राणाकडे सोपवली गेली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेसेनेच्या आमदाराकडून भाजप नेत्याला धमकी; राजकारण तापलं, नेमकं घडलं काय?

सेल्फीचा मोह जीवावर बेतला, तरुण थेट नदीत पडला|VIDEO

Maharashtra Live News Update : मालेगाव घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरच्या अकोलेत मोर्चा

Famous Singer Death: प्रसिद्ध गायकाचा कार अपघातात मृत्यू ; वयाच्या ४० व्या वर्षी निधन,संगीत विश्वात शोककळा पसरली

Amravati : धक्कादायक! सिनियरचा त्रास असाह्य झाला, फायर ब्रिगेड कर्मचाऱ्याची आत्महत्या

SCROLL FOR NEXT