shreyas iyer twitter
Sports

Punjab Kings Captain: श्रेयस अय्यरच्या हाती पंजाब किंग्जची धुरा! हटके स्टाईलमध्ये केली घोषणा

Shreyas Iyer, Punjab Kings Captain: आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी पंजाब किंग्जने आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

पंजाब किंग्जने आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. या स्पर्धेत मुंबईकर श्रेयस अय्यर पंजाबचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात पंजाब किंग्जने रेकॉर्डब्रेक बोली लावली होती.

पंजाबने त्याला २६.७५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं होतं. लिलावात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सने त्याला आपल्या संघात घेण्यासाठी पूर्ण जोर लावला. मात्र शेवटी पंजाब किंग्जने बाजी मारली आणि त्याला आपल्या संघात स्थान दिलं.

आयपीएल २०२५ स्पर्धेच्या लिलावातील सुरुवातीला श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. यापूर्वी कुठल्याच खेळाडूवर २५ कोटींपेक्षा अधिकची बोली लागली नव्हती. मात्र अवघ्या काही मिनिटात रिषभ पंतवर २७ कोटींची बोली लागली. लखनऊ सुपरजायंट्स संघाने त्याला आपल्या संघात स्थान दिलं. यासह रिषभ पंत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

पंजाबचा कर्णधार बनताच काय म्हणाला श्रेयस अय्यर?

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ स्पर्धेची ट्रॉफी उंचावली होती. आता तो पंजाबचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. दरम्यान संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती होताच, श्रेयस अय्यर म्हणाला,' संघाने माझ्यावर विश्वास दाखवला. पुन्हा एकदा रिकी पाँटींगसोबत काम करण्याची संधी मला मिळणार आहे, त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. आमचा संघ उत्कृष्ट समतोल असलेला मजबूत संघ आहे. मला विश्वास आहे, संघाने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो आम्ही सार्थ ठरवू आणि संघाला पहिलं जेतेपद जिंकून देऊ.

आगामी हंगामासाठी असा आहे पंजाब किंग्जचा संघ:

फलंदाज

श्रेयस अय्यर

शशांक सिंग

प्रभसिमरन सिंग

नेहाल वढेरा

विष्णु विनोद

हरनूर सिंग

मुशीर खान

पायला अविनाश

जोश इंग्लिश (ऑस्ट्रेलिया)

प्रियांश आर्या

ऑल राउंडर

मार्कस स्टॉयनीस (ऑस्ट्रेलिया)

ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)

सुयश शेडगे

मार्को जेन्सेन (द. आफ्रिका)

ऍरॉन हार्डी (ऑस्ट्रेलिया)

अझमतुल्लाह ओमरझाई (अफगाणिस्तान )

प्रवीण दुबे

गोलंदाज

युजवेंद्र चहल

अर्शदीप सिंग

वैशाख विजयकुमार

यश ठाकूर

हरुप्रीत ब्रार

कुलदीप सेन

झावियर बार्नेट (ऑस्ट्रेलिया)

लोकी फर्ग्युसन (न्यूझीलंड)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सायन पनवेल महामार्ग वाहतूक कोंडी

Navi Mumbai Airport नामकरणावरून वाद न्यायालयात, केंद्र सरकारकडून निर्णयाला विलंब

'Bigg Boss 19'च्या घरामध्ये राडा; 5 सदस्य नॉमिनेट, कुणाचा पत्ता कट होणार?

Satara Gazetteer: मराठा आरक्षणात सातारा गॅझेटियरचं महत्त्व काय? पाहा सविस्तर | VIDEO

Viral Video: क्रूरता! कुत्रा भुंकला म्हणून दुचाकीला बांधलं अन् गावभर फरफटत नेलं, नाशिकमधील व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT