Shoaib Akhtar On Virat Kohli  SAAM TV
Sports

T-20 क्रिकेट सोडून दे अन्....; विराट कोहलीला शोएब अख्तरनं दिलेल्या हटके सल्ल्यामुळं क्रिकेटविश्वच चक्रावलं...

Shoaib Akhtar On Virat Kohli : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानं विराट कोहलीला एक वेगळाच सल्ला दिला आहे.

Nandkumar Joshi

Shoaib Akhtar On Virat Kohli : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानं भारताचा माजी कर्णधार आणि रन मशीन विराट कोहली याला एक वेगळाच सल्ला दिला आहे. विराट कोहलीनं टी २० क्रिकेट सोडून द्यायला हवं असं मला वाटतं, असं शोएब म्हणाला.

मला असे वाटते की विराट कोहलीने टी २० क्रिकेट सोडून एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करावे. जेणेकरून त्याला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा १०० शतकांचा विक्रम मोडता येऊ शकेल, असे शोएब अख्तर (Shoaib Akhtar) म्हणाला.

विराट कोहली (Virat Kohli) गेल्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर एकही टी २० सामना खेळलेला नाही. बराच काळ फॉर्म नसल्यामुळं विराट कोहली टीकेचा धनी ठरला होता. पण आशिया चषक स्पर्धेपासून त्यानं जोरदार वापसी केली आणि टीकाकारांना बॅटनेच प्रत्युत्तर दिले. आता फॉर्मात आलेल्या विराटला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने वेगळाच सल्ला दिला आहे.

शोएब अख्तर स्पोर्ट्स तकशी बोलताना म्हणाला की, एक क्रिकेटपटू म्हणून मला असे वाटते की विराट कोहलीनं केवळ वनडे आणि टेस्ट फॉरमॅट खेळायला हवा. टी २० मुळे त्याची खूप एनर्जी वाया जाते. तो खूपच उत्सुक असतो. टी २० मध्ये विराट कोहली चांगली कामगिरी करत असल्याचे पाहायला मिळते. त्याला हा फॉरमॅट आवडतो. पण त्यानं काळजी घेण्याची आवश्यकता आहे. (Cricket News Update)

६ ते ८ वर्षे खेळू शकतो कोहली

विराट कोहली आताशी ३४ वर्षांचा आहे. तो सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. तो अजून सहा ते आठ वर्षे क्रिकेट खेळू शकतो. जर तो अजून ३०-५० कसोटी सामने खेळला तरी, त्यात आणखी २५ शतके करू शकतो, असा विश्वास देखील शोएब अख्तरनं व्यक्त केला.

दरम्यान, २००८ मध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७५ शतके केली आहेत. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्याने हा टप्पा गाठला आहे. कोहलीने १०८ कसोटी सामन्यांमध्ये २८ शतके आणि २७३ वनडेमध्ये ४६ शतके केली आहेत. तर टी २० मध्ये एक शतक केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: दीड लाख लाडक्या बहीण अपात्र, हफ्ता थांबला, चौकशीसाठी गर्दी

Mumbai Local Train: लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिरा, VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करणारे चमणकर बंधू दोषमुक्त

Daytime Sleepiness Risks: दिवसा झोप काढताय? सावधान! होऊ शकतो 'हा' जीवघेणा आजार

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये फूलऑन ड्रामा; PCBची धमकी, ICCचा नकार, पाकिस्तान संघाचं काय होणार?

SCROLL FOR NEXT