World Cup 2023: 'हा' संघ जिंकणार यंदाचा वर्ल्ड कप! ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

World Cup 2023 Winner: यंदा ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्याआधीच दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडूने कोण जिंकणार याबाबत भविष्यवाणी केली आहे.
World Cup 2023 Winner
World Cup 2023 Winnersaam tv
Published On

Brett Lee's Prediction About World Cup 2023 Winner: क्रिकेट विश्वचषक 2023 चे यजमानपद यावेळी भारताकडे आहे. यंदा ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत भारतात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु त्याआधीच दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडूने हा विश्वचषक कोण जिंकणार याबाबत भविष्यवाणी केली आहे.

हा संघ बनणार विश्वविजेता

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने 2023 च्या विश्वचषकाची ट्रॉफी कोणता संघ जिंकणार याबाबतची मोठी भविष्यवाणी केली आहे. ब्रेट ली म्हणाला, 'भारत विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. वर्ल्डकपमध्ये भारताला पराभूत करणे कठीण असेल.

भारतीय परिस्थितीबद्दल सर्वात जास्त आणि चांगली माहिती भारतीय संघाला आहे. त्यामुळे भारत 2023 विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे, असे ब्रेट ली म्हणाला. ब्रेट लीने स्पोर्ट्स यारीला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. (Cricket News)

World Cup 2023 Winner
Maharashtra Politics: विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या लग्नाची चर्चा! फडणवीसांच्या कोपरखळीला आदित्य ठाकरेंचा विनोदी पलटवार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल कोण जिंकेल?

याशिवाय ब्रेट लीने 7 जूनपासून होणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या विजेत्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. ब्रेट ली म्हणाला, 'भारत हा एक चांगला संघ आहे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. तिथली परिस्थिती ऑस्ट्रेलियाला अधिक अनुकूल असेल. त्यामुळे ऑस्ट्रेलिया वरचढ ठरले असे मला वाटते', असं ब्रेट ली म्हणाला. (Sports News)

World Cup 2023 Winner
Nagpur News: मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी, राज्याच्या राजकारणात खळबळ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल कधी?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (लंडन) मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात कोण जिंकेल याबाबात भारतीय चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. कारण गेल्या वेळी भारताला फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागला होता. त्यानतंर यावेळी भारत नक्की विजयी होईल अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com