Shivgarjana In IND vs BAN Cricket Match facebook
Sports

Viral Video: हजारो प्रेक्षकांमध्ये मावळा गरजला;भारत- बांगलादेश सामन्यातील शिवगर्जनेचा VIDEO पाहून छाती गर्वाने फुगेल

Shivgarjana In IND vs BAN Cricket Match: हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Shivgarjana In IND vs BAN Cricket Match:

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये गुरुवारी रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत बांगलादेशवर ७ गडी राखून विजय मिळवला. हा भारतीय संघाचा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला आहे. दरम्यान या सामन्यानंतर एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडला. हा सामना पाहण्यासाठी ३७ हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. दरम्यान या सामन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष पाहायला मिळाला आहे.

सामना पाहण्यासाठी आलेल्या हजारो प्रेक्षकांच्या मध्ये उभा राहत ऋतुराज संग्राम गावंडे या शिवभक्ताने छत्रपती शिवरायांची शिवगर्जना म्हटली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

हा व्हिडिओ संग्राम गावंडे या फेसबूक अकाउंटवरून शेअर करण्याता आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत आतापर्यंत ५ लाखांहुन अधिक लोकांनी पाहिला असून ५० हजारांहुन अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. (Latest sports news)

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, बांगलादेशने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २५६ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक १०३ धावांची खेळी केली. यासह भारतीय संघाने या सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला. यासह भारतीय संघाने या स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT