Sarkarnama Saam Tv
Sports

शिवसेना भाजप भिडले पण क्रिकेटच्या मैदानात; पाहा कोणी मारली बाजी

भाजपच्या टीमला दहा गुणांचा दंड भोवला.

साम वृत्तसंथा

पुणे : राज्याच्या राजकारणातील कट्टर विरोधक जेव्हा क्रिकेटच्या मैदानातही भिडतात, तेव्हा क्रिकेटचा सामनाही रंगतदार होतो. शिवसेना विरुध्द भाजपचा सामनाही रंगदतदार झाला आहे. पण शेवटी शिवसेनेच्या क्रिकेट टीमने भाजपला हरवून शिवसेनेने विजयी सलामी दिली. खासदार सुजय विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप संघावर मिलींद नार्वेकर यांच्या शिवसेना संघाने वर्चस्व राखले.

सरकारनामा आयोजित क्रिकेटनामा स्पर्धेत सत्ताधारी शिवसेनेना विरुध्द भाजपचा सामना रंगतदार झाला. या सामन्याची सुरुवातच अटीतटीची झाली. शिवसेनेच्या नार्वेकर यांच्या पहिल्याच चेंडूवर भाजपचे कर्णधार मुरलीधर मोहोळ यांना झेलबाद केले. यानंतर खेळपट्टी भाजपच्या राम सातपूते यांनी गाजवली. एक चौकार आणि एका षटकारासह २५ धावांची नाबाद खेळी केली.

भाजपला दहा गुणांचा दंड भोवला

या सामन्यात मॅजिक ओव्हरमध्ये दोन विकेट पडल्यामुळे भाजपला दहा गुणांचा दंड झाला. त्यामुळे भाजपची टीम बॅकफुटवर गेली. ६ षटकांत ३ बाद ३५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारूनही त्यांना हा दंड भोवला. शिवसेनेला डावाच्या सुरुवातीलाच दहा धावांचा बोनस मिळाला.

या सामन्यात शिवसेनेकडून धैर्यशील माने (१७) आणि आकाश सातपुते (१०) यांनी उरलेल्या धावा २.२ षटकांतच फटकावल्या. त्यामुळे शिवसेनेने हा सामना आपल्या नावावर केला. पुण्यातील सनीज वर्ल्ड येथील कृत्रिम हिरवळीच्या खेळपट्टीवर शनिवारी स्पर्धेला सुरुवात झाली. पहिला सामना भाजप विरुद्ध शिवसेनामध्ये रंगला. यावेळी दोन्ही संघातील खेळाडूंनी फलंदाजांना प्रोत्साहन दिले.

हे देखील पाहा

आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरल्या जाणाऱ्या डीआरएसची तांत्रिक सुविधा स्पर्धेच्या ठिकाणी आहे. त्यामुळे धावचितसारखे निर्णय मैदानावरील पंचांनी टीव्ही अम्पायरकडे सोपविले. त्यावेळी समालोचक योगेश सुपेकर लाव रे तो व्हिडिओ असा पुकारा करायचे. त्यानंतर हास्याचे फवारे उडायचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT