Shimron Hetmyer Saam TV
Sports

IPL 2022: हेटमायरने तात्पुरता सोडला राजस्थानचा संघ; वेस्ट-इंडिजला रवाना

राजस्थान रॉयलच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

Pravin

राजस्थान रॉयलच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांचा तडाखेबाज फंलंदाज शिमरन हेटमायरने राजस्थान रॉयलचा कॅम्प सोडला आहे. कारण शिमरन हेटमायरच्या घरुन गुड न्यूज आली आहे. शिमरन हेटमायर (Shimron Hetmyer) लवकरच बाबा होणार आहे. थोड्याच दिवसात तो पुन्हा संघात सामिल होणार आहे. राजस्थान रॉयलकडे यंदाच्या हंगामाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जाते.

मधल्या फळीत फलंदाजी करताना हेटमायरने संघाला अनेक विजय मिळवून दिले आहे. शेवटच्या सामन्यात हेटमायरने 16 चेंडूत 31 धावांची खेळी केली होती. ज्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले होते. राजस्थानच्या संघाने कालच्या सामन्यात पंजाबवरती सहा गडी राखून विजय मिळवला आहे. IPL 2022 मध्ये संघाचा हा सातवा विजय आहे.

राजस्थानने दिल्या शिमरॉन हेटमायरला शुभेच्छा

हेटमायरने लवकरच संघात सामील होणार आहे. “शिमरॉन हेटमायर त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी आज पहाटे गयानाला गेला आहे आहे. आम्ही त्याला शक्य तितकी मदत करत आहोत आणि आमच्या शुभेच्छा आहेत. तो लवकरच संघात परत येईल” अशी माहिती राजस्थानने ट्वीट करुन दिली आहे.

पुढे राजस्थान रॉयले म्हटले “आम्ही शिमरॉनची मुंबईला परत येण्याची वाट पाहत आहोत. तो आयपीएल 2022 मधील आमच्या उर्वरित सामन्यांसाठी रॉयल्सच्या सेवेत लवकरत येईल, खूप शुभेच्छा, हेट्टी. आम्ही तुझी वडील म्हणून पुन्हा येण्याची वाट पाहत आहोत''. या हंगामात हेटमायरने आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये 291 धावा केल्या आहेत आणि त्याची सरासरी आणि स्ट्राइक रेट अनुक्रमे 70 आणि 160 पेक्षा जास्त आहे. हेटमायरने यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी केली आहे. राजस्थानचा संघ सध्या प्लेऑफच्या रेसमध्ये आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dudhi Halwa Recipe : पाहुण्यांसाठी बनवा खास 'दुधी हलवा', चवीला जबरदस्त अन् करायला सोपा

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! महागाई भत्ता ६० टक्क्यांपर्यंत वाढणार? जाणून घ्या कधीपासून लागू होणार

Suraj Chavan : गुलीगत सूरज चव्हाणचा स्वॅग लय भारी; 'शेकी शेकी' गाण्यावर धरला ठेका, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : उपराजधानी नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार

मोठी बातमी! संजय गायकवाडांची कर्मचार्‍याला बेदम मारहाण, शिंदेंच्या शिलेदाराचा प्रताप कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT