shardul thakur  saam tv
क्रीडा

Shardul Thakur Batting: संघात का घेतलं म्हणून टोकलं; त्याच लॉर्ड शार्दुलने कांगारूंना ठोकलं...

Ankush Dhavre

IND VS AUS WTC FINAL LIVE: केनिंगटन ओव्हलच्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत सुरू आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन बलाढ्य संघ आमने सामने आले आहेत.

या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (९ जून) लॉर्ड शार्दुल ठाकूरची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली आहे. पहिल्या डावात त्याने जोरदार अर्धशतक झळकावले आहे.

अजिंक्यला दिली साथ..

ऑस्ट्रेलियाचा डाव ४६९ धावांवर आटोपल्यानंतर भारतीय फलंदाज फलंदाजी करण्यासाठी आले होते. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या जोडी कडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती.

मात्र हे दोघंही फलंदाज स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराटने देखील पॅव्हेलियनची वाट धरली. संघाची सर्व जबाबदारी १८ महिन्यांनंतर कमबॅक करत असलेल्या अजिंक्य रहाणेवर होती. त्याने रविंद्र जडेजा सोबत मिळून अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

रविंद्र जडेजा बाद झाल्यानंतर शार्दुल ठाकूर मैदानावर आला. अश्विनला संघाबाहेर करून शार्दुल संघात का घेतलं? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना शार्दुलने चांगलच उत्तर दिलं. त्याने अजिंक्य रहाणेला साथ देत शतकी भागीदारी केली. रहाणेचं शतक अवघ्या ११ धावांनी हुकलं. मात्र शार्दुलने अर्धशतक झळकावत भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहचवलं आहे. (Latest sports update)

मोठ्या विक्रमाला घातली गवसणी..

शार्दुल ठाकुरचे हे ओव्हलच्या मैदानावरील सलग तिसरे अर्धशतक आहे. या खेळीसह त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तो ओव्हलच्या मैदानावर सलग तिसरे अर्धशतक झळकावणारा तिसरा परदेशी फलंदाज ठरला आहे.

यापूर्वी हा कारनामा ॲलेन बॉर्डर आणि डॉन ब्रॅडमन यांनी केला आहे. यापुर्वी देखील जेव्हा भारतीय संघ अडचणीत होता, त्यावेळी शार्दुल ठाकूरने रिषभ पंतसोबत मिळुन महत्वपुर्ण भागीदारी केली होती. दोघांनी मिळून १०० पेक्षा अधिक धावा जोडल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT