शेन वॉर्न पुन्हा वादात; मॉडेलला अश्विल मेसेज करुन हॉटेलमध्ये बोलवल्याचा आरोप Saam TV
Sports

शेन वॉर्न पुन्हा वादात; मॉडेलला अश्विल मेसेज करुन हॉटेलमध्ये बोलवल्याचा आरोप

अफेअर आणि सेक्स स्कँडल्समुळे त्यांचे लग्नही मोडले आहे.

वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्न (Shane Warne) पुन्हा एकदा वादात सापडला आहे. मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री जेसिका पॉवरने त्याच्यावर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप केला आहे. शेन वॉर्नने पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉटही जेसिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये वॉर्न जेसिकाला हॉटेलच्या खोलीत भेटण्यास सांगत आहे. तसेच, उत्तरात नकार आला असतानाही वॉर्नचे अनेक संदेश दिसत आहेत. इंग्लिश रिअॅलिटी शो बिग ब्रदर व्हीआयपीमध्ये जेसिक पॉवरने शेन वॉर्नवर आरोप केले होते. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि सर्वकाळातील महान फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेला वॉर्न भूतकाळातील त्याच्या वागण्यामुळे वादात सापडला आहे. अफेअर आणि सेक्स स्कँडल्समुळे त्यांचे लग्नही मोडले आहे.

30 वर्षीय जेसिकाने सांगितले की, शेन वॉर्नने तिला मेसेज केला होता. यामध्ये तो हॉटेलच्या खोलीत झालेल्या भेटीबाबत बोलत होते. जेसिकाने सांगितले की तिने वॉर्नला भेटण्यास नकार दिला. तो म्हणाला की ती "त्या प्रकारची मुलगी नाही". पण यानंतरही ५२ वर्षीय वॉर्नकडून अनेक मेसेज आले. यामध्ये ते भेटीबाबत बोलत होते. नंतर जेसिकाने शेन वॉर्नचा नंबर ब्लॉक केला. जेसिकाने याआधीही वॉर्नसोबतच्या तिच्या संभाषणाबद्दल सांगितले होते.

शेन वॉर्नच्या चॅटचा स्क्रिनशॉट

आणखी अनेक मॉडेल्सनीही दावे केले

तिने बिग ब्रदरच्या शोमध्येच सांगितले की, वॉर्नने तिला अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्या योग्य नाहीत. जेसिका म्हणाली होती, 'मी त्याला उत्तर दिले पण नंतर तो खराब गोष्टी बोलू लागला. आणि मग मला वाटले की मी हे करू शकत नाही. याच संभाषणादरम्यान ऑस्ट्रेलियन मॉडेल एली गोन्साल्विसनेही दावा केला की तिलाही शेनकडून मेसेज आले आहेत. यामध्ये तो तिला बाहेर भेटण्यास सांगत आहे. पण 13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे तिच्याकडे या सगळ्यासाठी वेळ नव्हता. शोमध्ये सामील असलेली आणखी एक मॉडेल, इमोजेन अँथनीने देखील सांगितले की तिलाही शेन वॉर्नचे मेसेज आले आहेत. ती म्हणाली की तो खूप घाणेरडे मेसेज पाठवतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

Tapola Tourism : महाबळेश्वरपासून हाकेच्या अंतरावर वसलय हिडन हिल स्टेशन पाहा काश्मिरसारखे सौंदर्य क्षणात

SCROLL FOR NEXT