Shahid Afridi Vs Irfan Pathan : भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांच्यात फार पूर्वीपासून वाद आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर दोघांमधील संघर्ष वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर इरफान पठाणचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तान दौऱ्यादरम्यान आफ्रिदीसोबत झालेल्या वादाचा किस्सा इरफानने सांगितला आहे. ही घटना २००६ मध्ये एका विमानात घडल्याचे इरफान पठाणने स्पष्ट केले आहे.
इरफान पठाण किस्सा सांगताना म्हणाला, "२००६ च्या पाकिस्तान दौऱ्यात आम्ही कराचीहून लाहोरला विमानाने प्रवास करत होतो. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकत्र प्रवास करत होते. आफ्रिदी आला आणि त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला, माझे केस विस्कटत मला म्हणाला, 'कसा आहेस बाळा?' (और बच्चे कैसा है?) त्यावर 'तू कधीपासून माझा बाप झालास?' (तू कब से मेरा बाप बन गया?) असा सवाल मी त्याला केला. त्यावर तो काहीतरी म्हणाला, तो बालिशपणे वागत होता, तो माझा मित्र नव्हता."
"आफ्रिदीची सीट माझ्या शेजारी होती. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत मी अब्दुल रझाकशी गप्पा मारायला सुरुवात केली. मी रझाकला विचारले, येथे कोणत्या प्रकारचे मांस मिळते? अब्दुल रझाकने मला तेथे कोणत्या प्रकारचे मांस मिळते? ते सांगितले. इथे कुत्र्याचे मांस मिळते का? असा प्रश्न मी केला. तेव्हा आफ्रिदी तिथेच बसला होता. मी जे बोललो ते ऐकून रझाकला धक्का बसला, अरे इरफान तू असं का बोलत आहेस? असे अब्दुल रझाकने मला विचारले."
"अरे काही नाही त्याने (आफ्रिदी) कुत्र्याचे मांस खाल्ले आहे, तो बऱ्याच वेळापासून भुंकत आहेत, असे मी अब्दुल रझाकला म्हणालो. यावर आफ्रिदी काहीही बोलू शकला नाही. तो काहीतरी बोलण्यात तेवढ्यात मी तो बघ पुन्हा भुंकायला सुरुवात करतोय, असे म्हटले. त्यानंतर आफ्रिदी विमान लँड करेपर्यंत गप्प राहिला. तो माझ्याविरुद्ध जिंकू शकत नाही, हे आफ्रिदीला समजले. म्हणून तो माझ्या नादाला लागत नाही."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.