shaheen afridi  twitter
Sports

PAK vs IRE: प्रश्न काय, उत्तर काय देतोय; शाहीन आफ्रिदीची इंग्लिश ऐकून हसून हसून लोटपोट व्हाल

Shaheen Afridi Funny English: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत पाकिस्तान संघाची सुपरफ्लॉप कामगिरी पाहायला मिळाली आहे. पाकिस्तान संघातील खेळाडूंच्या फलंदाजी आणि गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणाचीही तुफान चर्चा असते. आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा पाकिस्तानी खेळाडू झेल टिपताना एकमेकांना धडकले. दरम्यान सामना झाल्यानंतर याबाबत शाहीन आफ्रिदीला प्रश्न विचारला गेला. त्यावेळी त्याने प्रश्न भलताच होता आणि उत्तर भलतंच काहीतरी दिलं. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर शाहीन आफ्रिदीला समालोचकाने प्रश्न विचारला. ज्यात त्याला झेल टिपताना जी धडक झाली त्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. इंग्रजी भाषेत विचारण्यात आलेला हा प्रश्न त्याला कळालाच नाही. तो भलतंच काहीतरी उत्तर देऊ लागला.

प्रश्न भलताच, उत्तर भलतंच काहीतरी

तर झाले असे की, आयर्लंड संघाची फलंदाजी सुरु होती. त्यावेळी १४ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मार्क आडायरने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उस्मान खान आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात जोरदार धडक झाली. सामन्यानंतर त्याला विचारण्यात आलं की, ही धडक कशी झाली? इंग्रजी भाषेत विचारण्यात आलेला हा प्रश्न त्याच्या डोक्यावरुन गेला. काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून तो म्हणाला की, 'चेंडू स्विंग होत होता, जुना चेंडूही फायदेशिर ठरत होता. एक गोलंदाजी युनिट म्हणून आम्ही चांगली कामगिरी केली.' हा मजेशिर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

पाकिस्तानचा विजय

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात आयर्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडला अवघ्या १०६ धावा करता आल्या. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १०७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानी फलंदाजांची चांगलीच दमछाक उडाली. या सामना पाकिस्तानने ७ गडी राखून आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Russia- Ukraine War: रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; टार्गेटवर कीवमधील मंत्री, कॅबिनेट इमारतीतून उठले धुरांचे लोट

Lalbaugcha Raja Viral Video : लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी सुरक्षारक्षकांचा मुजोरीपणा, बाप लेकीला ढकलले आणि...

Maharashtra Live News Update: पुण्यात गणपती विसर्जनाला रेकॉर्ड, ३१ तासांपासून मिरवणूक सुरूच

Online Food Delivery : ऐन सणासुदीच्या हंगामात महागाईची फोडणी; ऑनलाइन जेवण ऑर्डर करणे महागणार?

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : भरतीच्या अडथळ्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब|VIDEO

SCROLL FOR NEXT