Yuvraj Singh, Harbhajan Singh, Virendra Sehwag Saam TV
क्रीडा

सेहवाग, युवराज, भज्जी पुन्हा गाजवणार क्रिकेटचं मैदानात; जाणून घ्या निमित्त

संघांचा कर्णधार कोण असेल हे अद्याप ठरलेले नाही.

वृत्तसंस्था

वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि हरभजन सिंग ओमानमध्ये २० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (LLC) इंडिया महाराजा संघाकडून खेळताना दिसणार आहेत. LLC ही निवृत्त क्रिकेटपटूंची व्यावसायिक लीग आहे ज्यामध्ये तीन संघ सहभागी होतील. इतर दोन संघ आशिया आणि उर्वरित जगातील खेळाडूंचे असणार आहेत. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे या लीगचे आयोजक आहेत. सेहवाग, युवराज (Yuvraj Singh) आणि हरभजन (Harbhajan Singh) व्यतिरिक्त, इंडिया महाराजा संघात इरफान पठाण, युसूफ पठाण, बद्रीनाथ, आरपी सिंग, प्रज्ञान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणुगोपाल राव, मुनाफ पटेल, संजय बांगर, नयन मोंगिया आणि अमित भंडारी यांचा समावेश आहे. संघांचा कर्णधार कोण असेल हे अद्याप ठरलेले नाही. (Legend Cricket League 2022 Schedule)

आशिया लायन्स नावाच्या आशियाई संघात पाकिस्तान आणि श्रीलंकेचे माजी दिग्गज शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, कामरान अकमल, चामिंडा वास, रोमेश कलुवितरना, तिलकरत्ने दिलशान, अझहर महमूद, उपुल थरंगा, मिसबाह-उल-हक, सनथ जयसूर्या. मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, मोहम्मद युसूफ आणि उमर गुल यांचा समावेश आहे.

तिसऱ्या संघातील खेळाडूंची घोषणा अद्याप व्हायची आहे

अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगाण देखील आशियाई संघाचा भाग असणार आहे, तर तिसऱ्या संघातील खेळाडूंची घोषणा अद्याप झालेली नाही. या संघात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज या संघांतील खेळाडूंचा समावेश असेल, असे मानले जात आहे. याबाबत अनेक माजी खेळाडूंशी चर्चा सुरू आहे. लीगशी संबंधित एका मीडिया रिलीझमध्ये रवी शास्त्री म्हणाले, 'खऱ्या राजांप्रमाणे ते येतील, ते पाहतील आणि विजयी होतील. भारताचे क्रिकेट महाराज आशिया आणि उर्वरित जगातून येणाऱ्या दोन संघांच्या भेटीला येत आहेत. सेहवाग, युवराज आणि भज्जी, आफ्रिदी, मुरली, चमिंडा, शोएब यांच्याविरुद्ध खेळतील तेव्हा चुरशीची लढत होईल. चाहत्यांसाठी हा मजेदार सामना असणार आहे.

भज्जी नुकताच निवृत्त झाला

हरभजन सिंगने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता पण आयपीएलमध्ये (IPL) खेळताना दिसत होता. पण आता त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटपासून निवृत्ती घेतली आहे. लीग क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी दिग्गज उपलब्ध आहेत. त्याचवेळी रवी शास्त्री हे काही महिन्यांपूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. आता तेही या पदापासून वेगळे झाले आहेत. अशा स्थितीत प्रशिक्षकानंतर ते आता आयुक्तांच्या भूमिकेत दिसणार आहेत. भारत महाराजांच्या उर्वरित खेळाडूंबद्दल सांगायचे तर, हे सर्वजण खूप पूर्वीच निवृत्त झाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

SCROLL FOR NEXT