team india 
Sports

Karun Nair: सगळ्यांना कसं घेणार.. आगरकरांनी सांगितलं करुण नायरला वगळण्यामागचं कारण

Champions Trophy 2025, Ajit Agarkar On Karun Nair: भारताचा स्टार फलंदाज करुण नायरने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. मात्र तरीदेखील त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. २०१७ नंतर पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेसाठी संघात धक्कादायक बदल करण्यात आले आहेत. काही नवख्या खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आलं आहे. तर संघात खेळण्यासाठी पात्र असलेल्या खेळाडूंना वगळण्यात आलं आहे. या संघातून संजू सॅमसन, मोहम्मद सिराज आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या करुण नायरला वगळण्यात आलं आहे.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत करुण नायरची बॅट आग ओकतेय. या फलंदाजाने आतापर्यंत ५ शतकं झळकावली आहेत. कर्नाटककडून खेळणाऱ्या या फलंदाजाने कर्नाटक सोडून विदर्भाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला. कारण विदर्भाकडून खेळताना त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगलाच धावांचा पाऊस पाडला.

या फलंदाजाने जम्मू आणि काश्मिरविरुद्ध झालेल्या सामन्यात नाबाद ११२ धावांची खेळी केली होती. तर छत्तीसगडविरुद्ध झालेल्या सामन्यात नाबाद ४४, चंदीगडविरुद्ध झालेल्या सामन्यात नाबात १६३, तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात नाबाद ११, उत्तरप्रदेशविरुद्धच्या सामन्यात ११२, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात नाबाद १२२ आणि महाराष्ट्रविरुद्ध खेळताना त्याने नाबाद ८८ धावा केल्या.

विजय हजारे ट्रॉफीत या फलंदाजाने ७०० हून अधिक धावा चोपल्या आहेत. त्यामुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात संधी मिळणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात होती. मात्र त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. करुण नायरबाबत प्रश्न विचारला असता मुख्य निवडकर्ते अजित आगरकर म्हणाले, ' "कोणीतरी 700+ची सरासरी गाठतो, हे खरोखरच खास कामगिरी आहे. सध्या या संघात जागा मिळवणं खूप कठीण आहे. संघात फक्त १५ खेळाडूंना संधी मिळू शकते, सगळ्यांना कसं घेणार.'

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडताना वेळपत्रक वाचा

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

OPPO Find X9 Series: येणार येणार तुमचा फोटो भारीच येणार! दमदार कॅमेरावाला OPPO Find X9 Series च्या लॉन्चची तारीख आली समोर

Rishab Shetty : 'कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टी पोहचला वाराणसीला, घेतले महादेवाचे दर्शन

Kalyan Crime: धक्कादायक! शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला, कल्याणमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT