Team India  Saam Tv
क्रीडा

ICC WTC Point Table:भारताचं दुसऱ्यांदा WTC फायनलचं तिकीट जवळजवळ कन्फर्म! पाहा पॉइंट्स टेबल

यासह भारतीय संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग आता सोपा झाला आहे.

Saam TV News

ICC WTC Point Table:नुकताच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला.

यासह मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला होता. यासह भारतीय संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग आता सोपा झाला आहे.(Latest Sports Updates)

यापूर्वी झालेल्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. आता सलग दुसऱ्यांदा भारतीय संघ (Team India) अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो. यावेळी भारतीय संघाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होऊ शकतो.

अशी आहे पॉइंट्स टेबलची स्थिती...

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताचा विजय झाल्याने, पॉइंट्स टेबलमध्ये फरक पडला आहे. ऑस्ट्रेलिया ६६.६७ गुणांसह अजूनही प्रथम स्थानी कायम आहे. मात्र त्यांच्या गुणांवर फरक पडल्याचे पाहायला मिळाले आहे.

तर भारतीय संघ ६४.०६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघाला जर अंतिम फेरीत प्रवेश करायचा असेल तर, ही मालिका ३-० ने आपल्या नावावर करावी लागणार आहे. या यादीत ५३.३३ गुणांसह श्रीलंका संघ तिसऱ्या स्थानी आहे.

तर ४८.७२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. पुढील २ सामन्यात जर भारतीय संघाचा पराभव झाला तर, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या मालिकेवर भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना हा ७ ते ११ जून दरम्यान पार पडणार आहे. सामन्यात पाऊस आला किंवा काही कारणास्तव या सामन्यात अडथळा निर्माण झाल्यास,राखीव दिवशी सामना खेळवला जाईल. १२ जून हा या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

SCROLL FOR NEXT