भारतीय खेळाडूंची सुवर्ण भरारी सुरुच आहे. भारताची बॅडमिंटन जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन पुरूष दुहेरीत सुवर्ण पदक जिंकलं आहे. सात्विक आणि चिरागने कोरियाच्या बॅडमिंटनपटूंचा 21 - 18, 21 - 16 ने पराभव केला आहे. भारताने या स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकलं आहे. (Latest Marathi News)
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची कमाई शंभर पार झाली आहे. आशिया क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत २८ सुवर्ण, ३५ रौप्य, ४० कांस्य पदके जिंकली आहेत. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण १०३ पदके जिंकली आहेत. भारताच्या खेळाडूंनी १४ व्या दिवशीही चांगला खेळ दाखवला.
सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने कोरियाच्या चोई आणि किम वोनहो या दोघांचा पराभव केला आहे. या सामन्यात पहिला गेम हा 21 - 18 असा जिंकला. तर सामन्यातील दुसरा गेम 21 - 16 असा खेळत सुर्वण पदकावर नाव कोरलं.
भारताची सध्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेली जोडी आता पुढील आठवड्यात अव्वल स्थानावर पोहचेल. इंडोनेशियाच्या फाजार अलफिअन आणि मोहम्मद रैन अरदिनतो यांना आता पहिल्या स्थानावरून पायउतार व्हावं लागणार आहे.
तत्पूर्वी, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने इतिहास घडवला आहे. या स्पर्धेत अफगाणिस्तानचा पराभव करून भारताने सुवर्ण पदक जिंकलं आहे. तर भारतीय महिला कबड्डी संघाने चीनच्या तैपेईचा आणि पुरुषांच्या कबड्डी संघानेही इराणच्या संघाचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.