rohit sharma sarfaraz khan father twitter
Sports

Sarfaraz Khan Father : 'सरफराजला सांभाळून घ्या..', वडिलांनी भावनिक साद घालताच रोहितने दिलं मन जिंकणारं उत्तर

Naushad Khan On Rohit Sharma: पदार्पणाची कॅप मिळताच सरफराज खान आपल्या वडिलांना कॅप घालण्यासाठी धावला. त्याने वडिलांना आणि पत्नीला मिठीही मारली. दरम्यान रोहित शर्मानेही नौशाद खान यांचं अभिनंदन केलं

Ankush Dhavre

Sarfaraz Khan Father Viral Video:

आपलं स्वप्नं उतरताना पाहून सरफराज खानचे वडील नौशाद खान यांना गहिवरून आलं आहे. त्यांचे अश्रू थांबता थांबत नाहीत. कित्येक वर्ष वाट पाहिल्यानंतर अखेर सरफराज खानला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. पदार्पणाची कॅप मिळताच सरफराज खान आपल्या वडिलांना कॅप घालण्यासाठी धावला. त्याने वडिलांना आणि पत्नीला मिठीही मारली. दरम्यान रोहित शर्मानेही नौशाद खान यांचं अभिनंदन केलं.

सरफराज खानच्या पदार्पणानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात रोहित शर्माने नौशाद खान आणि सरफराज खानच्या पत्नीची भेट घेतल्याचं दिसून येत आहे. त्यावेळी नौशाद खान त्याला म्हणाले की, ' सर लक्ष्य ठेवा त्याच्यावर..' यावर उत्तर देत रोहित शर्मा म्हणाला की, ' होय नक्कीच..आम्हाला चांगलंच माहीत आहे तुम्ही त्याच्यावर किती मेहनत घेतली आहे.' गेल्या कित्येक वर्षांपासून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार खेळ करतोय. मात्र त्याला भारतीय संघात स्थान दिलं जात नव्हतं. अखेर रोहित धर्माच्या नेतृत्वाखाली त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली आहे.

पदार्पणात झळकावलं अर्धशतक...

सरफराज खानचा उत्साह वाढवण्यासाठी त्याचे वडील आणि पत्नी देखील राजकोटच्या मैदानावर उपस्थित होते. सरफराज खान ड्रेसिंग रुममध्ये ४ तास पॅड घालून बसला होता. त्यानंतर त्याची फलंदाजी आली.

सुरुवातीला त्याने चेंडू खेळून काढले. मात्र त्यानंतर त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सरफराज खान फिरकी गोलंदाजी चांगली खेळतो. इंग्लंडकडून फिरकी गोलंदाजी आक्रमण सुरु होतं. या संधीचा फायदा घेत त्याने इंग्लिश गोलंदाजांवर हल्लाबोल केला. आपल्याच पहिल्याच कसोटीत त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ६२ धावांवर फलंदाजी करत असताना त्याला जडेजाच्या चुकीमुळे धावबाद होऊन माघारी परतावं लागलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT