sarafaraz khan emotional video twitter
Sports

Sarfaraz Khan Debut: कष्टाचं चीज झालं! पदार्पणाची कॅप मिळताच सरफराजची वडिलांना जादूची झप्पी; पत्नीलाही अश्रू अनावर- Video

India vs England 3rd Test, Sarfaraz Khan Emotional Video: या सामन्याचं नाणेफेक होण्यापूर्वी त्याला ही कॅप देण्यात आली. गेल्या कित्येक वर्षांपासून खान कुटुंब या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतं.

Ankush Dhavre

Sarfaraz Khan Emotional Video:

भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. हा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात सरफराज खानला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे.

या सामन्याचं नाणेफेक होण्यापूर्वी त्याला ही कॅप देण्यात आली. गेल्या कित्येक वर्षांपासून खान कुटुंब या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतं. अखेर १५ फेब्रुवारी रोजी त्याचं भारतीय संघासाठी खेळण्याचं स्वप्न सत्यात उतरलं आहे. पदार्पणाची कॅप मिळताच तो आई- वडिलांकडे गेला. ही कॅप पाहून त्याच्या आई-वडिलांना आणि पत्नीलाही अश्रू अनावर झाले.

गेल्या कित्येक वर्षांपासून त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली होती. रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्याला डॉन ब्रॅडमन आणि रनमशीन म्हटलं जात होतं.मात्र निवडकर्त्यांकडून त्याच्या कामगिरीची दखल घेतली जात नव्हती.

दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून केएल राहुल बाहेर झाल्यानंतर सरफराज खानचं नशीब फळफळलं. त्याला भारतीय संघासाठी बोलावणं आलं. मात्र या सामन्यात रजत पाटीदारला पदार्पण करण्याची संधी दिली गेली. या सामन्यात सरफराजला बाकावर बसावं लागलं. आता तिसऱ्या कसोटीतून श्रेयस अय्यर बाहेर झाल्यानंतर, मध्यक्रमात त्याची जागा भरून काढण्यासाठी सरफराज खानला संधी दिली गेली आहे.

खान कुटुंबात आनंदाचं वातावरण...

सरफराज खानला माजी भारतीय खेळाडू अनिल कुंबळेंच्या हस्ते ही कॅप प्रदाण करण्यात आली. ही कॅप मिळाल्यानंतर त्याचे डोळे पाणावले होते. तो कॅप घेऊन आपल्या वडिलांकडे गेला आणि वडिलांना मिठी मारली.

ही कॅप पाहून त्याच्या पत्तीचेही डोळे भरून आले. सरफराज खानला क्रिकेटपटू म्हणून घडविण्यात त्याच्या वडिलांचा मोलाचा वाटा आहे. त्याने नेहमी हेच सांगितलं आहे की, माझे वडील हेच माझे पहिले कोच आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

असा राहिलाय रेकॉर्ड ..

सरफराज खानच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावलं आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये ४५ सामन्यांमध्ये ३९१२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १४ शतक आणि ११ अर्धशतक झळकावली आहेत. तचर लिस्ट ए क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ३७ सामन्यांमध्ये त्याने ६२९ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT