संजू सॅमसनचा मोठा निर्णय, भारत-इंग्लंड मालिका सुरू असतानाच या स्पर्धेतून घेतली माघार saam tv
Sports

Sanju Samson : भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान संजू सॅमसनचा मोठा निर्णय; अचानक स्पर्धेतून नाव घेतलं मागे; सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

sanju samson latest news kcl withdrawal भारत विरुद्ध इंग्लंड टी २० मालिका सुरू असतानाच भारताचा सलामीवीर संजू सॅमसन यानं मोठा निर्णय घेतला आहे. केरळ क्रिकेट लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेत सगळ्यांनाच धक्का दिला आहे.

Nandkumar Joshi

आयर्लंड दौऱ्यात पुरता अपयशी ठरल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या टी २० सामन्यातही लक्षवेधी कामगिरी न करणाऱ्या संजू सॅमसनला तिसऱ्या टी २० सामन्यातून वगळण्यात आले. सध्या खराब कामगिरीमुळं टीकेचा धनी ठरलेल्या संजू सॅमसननं अचानक मोठा निर्णय घेतला आहे. काही वैयक्तिक कारणांमुळं केरळ क्रिकेट लीगमध्ये तो खेळणार नाही. कोची ब्लू टायगर्सने रिटेंशन लिस्टमध्ये त्याला स्थान दिलं नव्हतं. आता त्याचं नाव १५६ खेळाडूंच्या ऑक्शन लिस्टमध्येही समाविष्ट केलं नाही. विशेष म्हणजे त्याने स्वतःच ऑक्शनमध्ये भाग घेण्यात नकार दिला होता, असे सांगण्यात येत आहे.

गेल्या वर्षी कोची ब्लू टायगर्सने संजू सॅमसनला २६.८० लाख रुपयांना लिलावात खरेदी केले होते. केसीएलच्या इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. केसीएल २०२५ मध्ये सॅमसन याने पाच डावांमध्ये ३६८ धावा कुटल्या होत्या.

स्पोर्ट्स स्टारच्या वृत्तानुसार, केसीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन नजर माचान यांनी सांगितलं की, संजू सॅमसन यानं केरळ क्रिकेट लीगचे अधिकारी आणि कोची ब्लू टायगर्सला याबाबत कळवले आहे. केसीएलच्या तिसऱ्या पर्वात तो सहभागी होणार नाही, असे त्याने सांगितले आहे. त्यामुळे कोची ब्लू टायगर्स व्यवस्थापनाने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला यात वावगं असं काही नाही. केरळ क्रिकेट लीगचे तिसरे पर्व २० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याची फायनल ५ सप्टेंबरला खेळवली जाणार आहे.

संजू सॅमसन हा गेल्या काही दिवसांपासून टीकेचा धनी ठरत आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांत त्यानं फक्त सहा धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्येही त्याला स्थान दिले नाही. त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर अलीकडेच याबाबत वक्तव्य केले होते. सॅमसनला वगळले याचा अर्थ असा नाही की त्याला पुनरागमन करण्याची संधी मिळू शकत नाही. कदाचित चौथ्या टी २० सामन्यात पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये तो खेळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भीषण अपघात! कार दरीत कोसळली, वाहन बाहेर काढताच आतमध्ये असलेलं घबाड पाहून पोलीसही चक्रावले

Maharashtra politics : ठाकरेंनंतर पवारांना धक्का? ६ खासदार अस्वस्थ, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

Sleeping Problem: रात्री झोप लागत नाही? जाणून घ्या झोप न येण्याची ७ कारणं आणि करा हे उपाय

Maharashtra News Live Update: खेडमध्ये अतिवृष्टीचा हाहाकार; तिघांचा मृत्यू, एक जण बेपत्ता

Gold Silver Gift : सोने की चांदी? आवडत्या व्यक्तीला काय देणं शुभ ठरेल?

SCROLL FOR NEXT