Sanju Samson CSK : संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे. मागील अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये राजस्थानच्या संघाकडून खेळत आहे. आयपीएल २०२६ मध्ये संजू सॅमसन नव्या संघातून खेळणार असल्याचे म्हटले जात आहे. पुढच्या सीझनमध्ये संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसू शकतो असे म्हटले जात आहे. चेन्नई संघाच्या एका अधिकाऱ्याने याबाबतचे संकेत दिले आहे. संजू चेन्नईचा कर्णधार होऊ शकतो अशा चर्चाही रंगल्या आहेत.
सीएसकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संजू सॅमसन चेन्नईमध्ये येणार असल्याच्या चर्चांवर क्रिकबझला माहिती दिली. 'सलामी आणि यष्टीरक्षण अशी जबाबदारी चांगल्याप्रकारे सांभाळू शकेल अशा खेळाडूच्या आम्ही शोधात आहोत. जर संजू उपलब्ध असेल, तर आम्ही त्याला नक्कीच आमच्या संघात समाविष्ट करु. त्याच्या बदल्यात कोणाला ट्रेड केले जाईल यावर अजून निर्णय झाला नाहीये', असे अधिकाऱ्याने म्हटले आहे.
संजू सॅमसनला आयपीएलमध्ये खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. त्याने आयपीएल लीगमध्ये १७७ सामन्यांमध्ये १३९.०५ च्या स्ट्राईक रेटने ४७९४ धावा केल्या आहेत. सलामीवीर आणि यष्टीरक्षण अशा दोन्ही गोष्टी तो एकाच वेळी सांभाळू शकतो. राजस्थान रॉयल्सच्या संघाला संजूने आयपीएल २०२२ मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते. मागील अनेक दिवसांपासून संजू राजस्थान सोडून चेन्नईच्या संघात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
आयपीएल २०२५ मध्ये संजू सॅमसन दुखापतीमुळे बराच वेळ संघाबाहेर होता. त्याची कामगिरी देखील फारशी चांगली नव्हती. आयपीएल २०२५ मध्ये संजूने ९ सामन्यांमध्ये ३५.६३ च्या सरासरीने फक्त २८५ धावा केल्या, ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश होता. या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.