Jasprit bumrah
Jasprit bumrah  Saam Tv
क्रीडा | IPL

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहच्या घरी येणार नवा पाहुणा! फोटोमुळं चर्चेला उधाण

Ankush Dhavre

Jasprit Bumrah: आयपीएल स्पर्धेच्या अपार यशानंतर आता विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुध्द गुजरात जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

या सामन्यात तुफानी खेळी करणारी हरमनप्रीत कौर चर्चेचा विषय ठरली. मात्र जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनच्या एका व्हायरल फोटोमुळे जसप्रीत बुमराहचे चाहते खुश झाले आहेत.(Latest sports updates)

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. दुखापतग्रस्त असलेला जसप्रीत बुमराह आपली फिटनेस पुन्हा मिळ्वण्यासाठी एनसीएमध्ये सराव करतोय.

या दरम्यान विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या ओपनिंग सेरेमनीला उपस्थित असलेल्या संजना गणेशनचा एक फोटो जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

हा फोटो व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे, संजना गणेशन या फोटोत बेबी बंपसह कॉमेंट्री करताना दिसून येत आहे. हा फोटो पाहून जसप्रीत बुमराह लवकरच बाबा होणार असा अंदाज लावायला सुरवात केली आहे. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन हे दोघेही मार्च २०२१ रोजी विवाह बंधनात अडकले होते.

२०२१ मध्ये अडकला होता विवाह बंधनात..

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स प्रेजेंटर संजना गणेशन हे दोघेही २०२१ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. हा विवाह सोहळा गोवा येथे पार पडला होता. या कार्यक्रमात मोजक्याच लोकांना आमंत्रण देण्यात आले होते.

संजना गणेशन ही क्रिकेट लीग स्पर्धांमध्ये स्पोर्ट्स प्रेजेंटरची भूमिका पार पाडताना दिसून येत असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT