MI VS RR IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील १००० वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. दरम्यान शेवटच्या षटकात १७ धावांची गरज असताना टीम डेव्हिडने सलग ३ षटकार मारून मुंबईला विजय मिळवून दिला. दरम्यान रोहित शर्माची विकेट घेणारा संदीप शर्मा अप्रतीम झेल टिपल्यामुळे चर्चेत आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव राजस्थानच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. मात्र एक चूक आणि त्याने परतीची वाट धरावी लागली. तर झाले असे की, १६ वे षटक टाकण्यासाठी ट्रेंट बोल्ट गोलंदाजीला आला. त्यावेळी सूर्यकुमार यादव ५५ धावांवर फलंदाजी करत होता. ट्रेंट बोल्टने आखुड टप्प्याचा चेंडू टाकला.
ज्यावर सूर्यकुमार यादवने फाईन लेगच्या दिशेने शॉट मारला. चेंडू बराच वेळ हवेत होता. त्यावेळी संदीप शर्मा मागच्या दिशेने धावला आणि डाइव्ह मारत भन्नाट झेल टिपला. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Sandip Sharma Catch Video)
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवण्यासाठी २१३ धावांची गरज होती. ज्याप्रकारे सूर्यकुमार यादव फलंदाजी करत होता. ते पाहून असे वाटत होते की, मुंबईचा संघ सहजरित्या धावांचा पाठलाग करेल. मात्र संदीप शर्माच्या झेलमुळे राजस्थान रॉयल्स संघाने या सामन्यात पुनरागमन केलं. इथून राजस्थान संघाला सामना विजय स्पष्ट दिसत होता. मात्र शेवटच्या षटकात टीम डेव्हिडने सलग ३ षटकार मारून राजस्थान रॉयल्स संघाचा तोंडाचा घास हिसकावून घेतला. (Latest sports updates)
राजस्थानकडून यशस्वी जयस्वालचे तुफानी शतक
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबईकर यशस्वी जयस्वाल मुंबईच्या गोलंदाजांवर चांगलाच बरसला. त्याने या सामन्यात ६२ चेंडूंचा सामना करत १६ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १२४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्स संघाने ७ गडी बाद २१२ धावा केल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.