sachin tendulkar to ms dhoni attends pre wedding function of anant ambani and radhika merchant know the full list of cricketers saam tv news
Sports

सचिनपासून ते धोनीपर्यंत या दिग्गज खेळाडूंची Anant Ambani- Radhika Merchant यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला हजेरी

Anant Ambani- Radhika Merchant Pre Wedding: मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्रीवेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात सुरु आहे.

Ankush Dhavre

Cricketers At Anant Ambani- Radhika Merchant Pre Wedding:

मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्रीवेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात सुरु आहे. या सोहळ्याला जगप्रसिद्ध लोकांनी हजेरी लावली. कला, क्रीडासह क्षेत्रातील स्टार्ससह जगभरातील प्रसिद्ध उद्योगपतींनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली. दरम्यान मुंबई इंडियन्स संघातील माजी खेळाडू आणि सध्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा खेळत असलेल्या कायरन पोलार्डने ही स्पर्धा सोडून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंगला हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेला ट्रोल केलं जात आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगरमध्ये सुरु आहे. माध्यमातील वृत्तानुसार तो पुढील ४ दिवस जामनगरमध्ये राहणार आहे. त्यामुळे त्याला पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा अर्ध्यातून सोडावी लागली आहे. कायरन पोलार्डने गेली बरेच वर्ष मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याने २०१० पासून ते २०२२ पर्यंत या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे अंबानी कुटूंब आणि कायरन पोलार्ड यांचं जवळचं नातं आहे. (Cricket news in marathi)

पोलार्डसह या क्रिकेटपटूंनी लावली हजेरी..

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ग्रँड प्री वेडिंग सोहळ्याला भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसह, क्रृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, राशिद खान, ड्वेन ब्रावो यांसारख्या स्टार खेळाडूंनी हजेरी लावली. तसेच भारताचा टी-२० क्रिकेटमधील नंबर १ फलंदाज सूर्यकुमार यादव आणि आपली पत्नी देविका शेट्टीसह दिसून आला. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि जहीर खानने देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली.

या कार्यक्रमाला क्रिकेटपटूंसह बॉलिवूड स्टार्सनेही हजेरी लावली. अभिनेत्री आलिया भट्टसह, रणवीर कपूर आणि अर्जुन कपूर देखील एन्ट्री करताना दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT