sachin tendulkar  saam tv
Sports

Sachin Tendulkar Tweet: सचिनने ट्विट करत विचारलाय सोपा प्रश्न; सच्चा क्रिकेटप्रेमीच देऊ शकतो उत्तर

Sachin Tendulkar Tweet On Hindi Diwas: सचिनने हिंदी दिवसाचं औचित्य साधून एक ट्विट केलं आहे

Ankush Dhavre

Sachin Tendulkar Tweet On Hindi Diwas:

भारतीय संघातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन १० वर्ष झाली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरीदेखील लोकप्रियता काही कमी झालेली नाही.

सोशल मीडियावर त्याचे ट्विट प्रचंड व्हायरल होत असतात. नुकताच त्याने हिंदी दिवसाचं औचित्य साधून एक ट्विट केलं आहे. यासह नेटकऱ्यांना एक खास प्रश्न विचारला आहे.

दरवर्षी भारतात १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. या खास दिवशी सचिनने क्रिकेट चाहत्यांना एक सोपा प्रश्न विचारला आहे.त्याने क्रिकेटमध्ये वापरले जाणारे ४ शब्द ट्विट केले आहेत.

या ४ शब्दांना हिंदी भाषेत काय म्हणतात? असं त्याने विचारलं आहे. अंपायर, विकेटकिपर, फिल्डर आणि हेल्मेट असे ४ शब्द आहेत. या ट्विटवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया. या ट्विटवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest sports updates)

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया..

सचिन तेंडुलकरची कारकिर्द..

सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे.

त्याच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ४६३ सामन्यांमध्ये १८४२६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ९६ अर्धशतके आणि ४९ शतके झळकावली आहेत. तर कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने २०० कसोटी सामन्यांमध्ये ५३.८ च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५१ शतके आणि ६८ अर्धशतके झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : राज्यात दीड कोटी लाडक्या अपात्र? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Credit Card : आरबीआयचा क्रेडिटधारकांना मोठा झटका; ही सुविधा झाली बंद, काय आहेत नवीन गाईडलाइन?

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका करु नये?

Maharashtra Live News Update: पुण्यात पावसाचा कहर, बंगळूर-पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Pune Crime: साईड नाही दिली, भररस्त्यावर घायवळ गँगच्या लोकांनी घातली गोळी

SCROLL FOR NEXT