Ranji Trophy Saam Tv
Sports

Ranji Trophy: सचिन तेंडुलकरचा मुलगाही चमकला आणि मोहम्मद शमीचा धाकटा भाऊही! निमित्त रणजीचं...

Arjun Tendulkar News: रणजीच्या सामन्यांची सध्या भारतीय क्रिकेटमध्ये चर्चा सुरु आहे. रणजीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने सध्या सुरु आहेत. या सामन्यांमध्ये काही खेळाडूंनी दमदार कामगिरी करुन दाखवली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ranji Trophy News:

रणजीच्या सामन्यांची सध्या भारतीय क्रिकेटमध्ये चर्चा सुरु आहे. रणजीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने सध्या सुरु आहेत. या सामन्यांमध्ये काही खेळाडूंनी दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. अशाच एका सामन्यात सचिन तेंडुलकरचा सुपुत्र आणि गोव्याच्या संघाकडून खेळणारा अर्जुन तेंडुलकरही चर्चेत आलाय. अर्जुन तेंडुलकर याने अवघ्या 60 चेंडूंमध्ये 70 धावा ठोकून काढल्या आहेत. चार दिवसांच्या सामन्यात अर्जुनच्या स्ट्राईक रेटने सगळ्यांचं लक्ष वेधलंय. या स्ट्राईक रेटवरुनच अर्जुनच्या आक्रमक खेळीची कल्पना करता येऊ शकेल.

कोणत्या मॅचमध्ये आक्रमक खेळी?

गोवा विरुद्ध चंदीगड सामना सुरु होता. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरच्या बॅट चांगलीत तळपली. चंदीगडविरुद्ध खेळताना अर्जुनने 6 सिक्स आणि चार फोर मारले. चार दिवसीय सामन्यात अर्जुनने ज्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली, तो स्ट्राईक रेट गोव्याकडूनच 197 धावांची मोठी धावसंख्या उभारणाऱ्या सुयश प्रभुदेसाईच्या स्ट्राईक रेटच्या जवळपास दुप्पट होता. सुयश प्रभुदेसाईने 54च्या स्ट्राईक रेटने 116 धावा केल्या. तरर अर्जुन तेंडुलकरने 116च्या स्ट्राईकनेरटने 70 धावा केल्यात.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फक्त सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच रणजीच्या सामन्यांमध्ये चमकलाय, अशातला भाग नाही. तर टीम इंडियातले काही दिग्गज खेळाडूंनीही तितकच दमदार कामगिरी रणजीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांमध्ये करुन दाखवलीय.  (Latest Marathi News)

सध्या टीम इंडियात येण्यासाठी जरी धडपड सुरु असली, तरीही भुवनेश्वर कुमार यानेही आपल्यात अजूनही बरंच क्रिकेट बाकी आहे, हे रणजीच्या सामन्यांमधून दाखवूनन दिलंय. भुवनेश्वर कुमार याने रणजी ट्रॉफीत दमदार कमबॅक केलंय. बंगाल विरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वरच्या गोलंदाजीने फलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. बंगालचा टॉप ऑर्डर बॅटिंग लाईनअप भुवनेश्वरने उद्ध्वस्त केला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तेराव्यांदा त्याने 5 विकेट घेतले.

मयांकही चमकला!

कर्नाटक संघाचा कर्णधार मयंक अग्रवालही गुजरात विरुद्धच्या सामन्यात जबरदस्त खेळला. मयंकने 190 धावा केल्या. 17 चौकार आणि 1 षटकार ठोकत मयंकचीही बॅट तळपली. मयंकच्या शतकी खेळीच्या जोरावर कर्नाटकनेही 300 धावांचा डोंगर उभा केला.

शमीच्या भावानेही नाव काढलं!

वर्ल्ड कपमध्ये ज्याच्या गोलंदाजीने भारताची ताकद वाढवली, त्या मोहम्मद शमीच्या धाकट्या भावानेही रणजीत सगळ्यांचं लक्ष वेघलंय. कानपूरमध्ये उत्तर प्रदेशचा संघ अवघ्या 60 धावांमध्ये बाद झाला. या खेळीत मोहम्मह शफीचा छोटा भाऊ मोहम्मद कैफ याने 5.5 ओव्हर टाकत चार विकेट्स घेतल्या. त्याही अवघ्या 14 धावांच्या मोबदल्यात. इतकंच काय तर बॅटसोबतही योगदान दिलं. 45 धावांची खेळी करत मोहम्मद कैफनेही सगळ्यांचं लक्ष वेधलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT