Sachin Tendulkar Saam Tv
Sports

Sachin Tendulkar News: सचिन तेंडुलकर बनला आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपचा जागतिक अ‍ॅम्बॅसडर

Sachin Tendulkar: आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा आणि क्रिकेट खेळणाऱ्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक म्हणून सचिन तेंडुलकर ओळखला जातो.

Bharat Jadhav

Sachin Tendulkar Become Global Ambassador For ODI World Cup:

भारताचा वरिष्ठ माजी फलंदाज आणि वन डे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा सचिन तेंडुलकर वर्ल्डकप २०२३ चा अ‍ॅम्बॅसडर बनलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)नं आज त्यांची अ‍ॅम्बॅसडर नियुक्ती केलीय. आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा आणि क्रिकेट खेळणाऱ्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक म्हणून त्याला ओळखले जाते. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सचिन वर्ल्डकपचं उद्घाटन करेल. सामन्यापूर्वी पुरुष क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीसह सचिन मैदानात येईल आणि स्पर्धेचे उद्घाटन करेल. (Latest News)

दरम्यान पत्रकारांशी बोलताना सचिन म्हणाला की, २०११ मध्ये विश्वकप जिंकणं माझं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं. माझ्या हृदयात विश्वकपसाठी एक वेगळं स्थान आहे. मी १९८७ मध्ये बॉल बॉय असण्यापासून ते ६ वर्ल्डकपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलंय. तसेच २०११ मध्ये वर्ल्डकप जिंकणं हा माझ्या क्रिकेट प्रवासातील सर्वात अभिमानास्पद क्षण होता. यंदा भारतात होणार्‍या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये अनेक संघ आणि खेळाडू दमदार स्पर्धा करण्यासाठी सज्ज आहेत. मी या स्पर्धेची उत्सुकतेने वाट पाहत आहे,” असंही सचिन म्हणाला.

दरम्यान, आतापर्यंतच्या क्रिकेट विश्वचषकात वेस्ट इंडिजचे दिग्गज व्हिव्हियन रिचर्ड्स, दक्षिण आफ्रिकेचे एबी डिव्हिलियर्स, इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन, ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच, श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन, न्यूझीलंडचे महान स्पिनर. रॉस टेलर, भारताचा सुरेश रैना आणि माजी कर्णधार मिताली राज आणि पाकिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद हाफीज, हे देखील अ‍ॅम्बॅसडर झालेत.

क्रिकेटचे दिग्गज आपल्या चाहत्यांना आणि आपल्या विश्लेषणातून आपल्या अनुभवाच्या आधारे खेळाशी जोडून ठेवतील. विश्वचषक स्पर्धेसारख्या इव्हेंटची स्वप्ने अनेक तरुणांच्या मनात असतात. मला आशा आहे की, हा वर्ल्डकप तरुण मुली आणि मुलांनाही खेळात रुची निर्माण करण्यास आणि त्यांच्या देशांचे सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करण्यास त्यांना प्रेरित करेल,” असं सचिन तेंडुलकर शेवटी बोलताना म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

SCROLL FOR NEXT