sachin tendulkar twitter
Sports

Vinod Kambli: मोठ्या मनाचा क्रिकेटचा देव! कांबळीला पाहताच सचिन भेट घेण्यासाठी धावला ;पाहा VIDEO

Sachin Tendulkar Meets Vinod Kambli: मुंबईतील एका कार्यक्रमात सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकत्र आले होते. यादरम्यान सचिनने विनोद कांबळीची भेट घेतली. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Sachin Tendulkar Meets Vinod Kambli Viral Video: सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीसारखे स्टार खेळाडू घडवणारे दिग्गज, रमाकांत आचरेकर सर यांनी २ जानेवारी २०१९ ला या जगाचा निरोप घेतला होता. आता त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत स्मारकाचं अनावरण करण्यात आलं.

या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी एकाच मंचावर उपस्थित होते. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय ज्यात सचिन तेंडुलकरन विनोद कांबळीची भेट घेताना दिसून येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, सचिन तेंडुलकर स्वतः उठून जातो आणि विनोद कांबळीची भेट घेतो. तर दुसरीकडे विनोद कांबळी अस्वस्थ असल्याचं दिसून येत आहे.

त्याची प्रकृती ठीक नसल्याचं दिसून येत आहे. तो उठण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला उठायला ही होत नाहिये. काही महिन्यांपूर्वी कांबळीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात त्याला व्यवस्थित चालता ही येत नव्हतं. हा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाला होता.

विनोद कांबळीवर आर्थिक संकट ओढावलं होतं. त्याने सोशल मीडियाच्या साहाय्याने नोकरीची मागणी केली होती. बीसीसीआयकडून त्याला ३० हजार रुपये पेन्शन म्हणून मिळतात. सचिन तेंडुलकरने त्याला मेंटॉरची नोकरी मिळवून दिली होती. मात्र सचिनची मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमी ही कांबळीच्या घरापासून दुर आहे. त्यामुळे त्याला ही नोकरी सोडावी लागली होती.

अशी राहिलीये कारकिर्द विनोद कांबळीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला भारतीय संघासाठी १०४ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने २४७७ धावा केल्या. वनडेत त्याच्या नावे २ शतकं आणि १४ अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे.

त्याच्या कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १७ कसोटीतील २१ डावात १०८४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ शतक ३ अर्धशतकं झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

SCROLL FOR NEXT