Will Sachin Tendulkar become BCCI President in 2025 Saam TV Marathi
Sports

सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा अध्यक्ष होणार? कारणही आले समोर आले

Why Sachin Tendulkar BCCI President : क्रिकेटमधील योगदान, पश्चिम विभागाकडे अध्यक्षपदाचा हक्क, संघटनेत खेळाडूंची वाढती भूमिका आणि राजकीय समर्थन यामुळे सचिनच्या नावाला प्राधान्य मिळत आहे.

Namdeo Kumbhar

  • रॉजर बिन्नी यांनी अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

  • बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत अध्यक्षपदाबाबत प्राथमिक चर्चा

  • २९ सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षाची निवड होणार आहे.

  • या वेळी अध्यक्षपद पश्चिम विभागाकडे जाण्याची शक्यता

Will Sachin Tendulkar become BCCI President in 2025 क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा (भारतीय क्रिकेट बोर्ड) अध्यक्ष होणार असल्याची चर्चा आहे. बीसीआयची सचिन तेंडुलकर याच्यासोबत अनौपचारिक चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची बीसीसआयचा अध्यक्ष म्हणून एकमताने निवड होणार आहे. रॉजर बिन्नी यांनी यांनी अचानक अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्षपद सध्य रिक्त झाले आहे. बीसीसीआयकडून अध्यक्षपदासाठी चाचपणी करण्यात येत आहे. सचिन तेंडुलकर याच्यासोबत बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली असून सकारात्मक प्रतिसाद मिलाला आहे. लवकरच बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. २९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे, त्याच दिवशी अध्यक्षपदाची घोषणा होणार आहे.

सचिन तेंडुलकर अध्यक्ष होण्याचं कारण काय?

बीसीसीआय अध्यक्षाची निवड २९ सप्टेंबरपर्यंत होणार आहे. त्यासाठी सचिन तेंडुलकर याच्या नावाची चर्चा सर्वाधिक होत आहे. सचिन तेंडुलकर याच्या निवडीला बीसीसीआयमधून एकमताने होकार असल्याचे वृत्त समोर आलेय. बीसीसीआयमधील सूत्रांच्या माहितीनुसार, अध्यक्षपद यावेळी पश्चिम विभागाकडे असणे अपेक्षित आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर याच्या नावाचा विचार करण्यात येत आहे. दरम्यान, नवा क्रीडा कायदा आलेला असताना केंद्रासह संघर्ष टाळण्यासाठी बीसीसीआय सचिनकडे अध्यक्षपद देण्याचा विचार करत आहे.

२९ तारखेला होणार निर्णय?

बिन्नी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर बीसीसीआयची धुरा कोण संभाळणार? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सौरव गांगुली, रॉजर बिन्नी या माजी खेळाडूंनी अध्यक्षपद भूषावले आहे. आता सचिन तेंडुलकर याच्या नावाची चर्चा आहे. २९ सप्टेंबर रोजी बीसीसीआयच्या वार्षिक सभा होणार आहे. त्यावेळी अध्यक्ष, सहसचिव, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि आयपीएल चेअरमनपदासाठी निवडणूक होणारेय. बिन्नी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर सचिन तेंडुलकर याच्यासोबत बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या महत्त्वाच्या निर्णायात मार्गदर्शन करणाऱ्या काही राजकीय नेत्यांनीही सचिनच्या नावाला दुजोरा दिलाय. त्याशिवाय क्रीडा संघटनांची सूत्रे खेळाडूंकडे असावीत यासाठी केंद्र सरकार आग्रही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, धावत्या ट्रकमधून व्हॅक्सिनचा मुद्देमाल जप्त

Jerusalem Terror Attack : राजधानीत दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार! ५ जणांचा जागीत मृत्यू, थरारक VIDEO समोर

Viral Video: अजबच! बी. एड . करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जलवा, परीक्षेला चक्क हेलिकॉप्टरने गेले

Maval : ग्रामसभेत अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; ग्रामपंचायत प्रशासनाला कंटाळून नागरिक संतप्त

Bigg Boss 19: 'नॉमिनेशनचा दिवस येऊ द्या...', तान्या मित्तलने कुनिकाला दिली धमकी ; बिग बॉसच्या घरात नवा गोंधळ

SCROLL FOR NEXT