sachin tendulkar  saam tv
Sports

Sachin Tendulkar Filed Case: क्रिकेटच्या देवाची पोलीस स्थानकात धाव, लोकांची फसवणूक टाळण्यासाठी घेतली टोकाची भूमिका

Sachin Tendulkar: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

Ankush Dhavre, सुरज सावंत

Fraud With Sachin Tendulkar: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. खोट्या जाहिराती, फोटो आणि आवाज वापरल्या प्रकरणी त्याने गुरुवारी मुंबईच्या क्राईम ब्रांचमध्ये गुन्हा नोंदवला आहे.

त्याने आरोप केले आहे की , त्याच्या आवाजाचा आणि फोटोचा वापर करून लोकांकडून पैसे उकळण्याचे काम सुरु आहे. इतकेच नव्हे तर, जाहिरातींमधून असा दावा देखील करण्यात आला आहे की, त्यांचं प्रोडक्ट खरेदी केल्यास सचिनचा ऑटोग्राफ दिला जाईल.

सचिनने तक्रार नोंदवताच सायबर सेल सक्रिय झाले असून, त्यांनी तपास करायला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिनच्या जवळच्या सहकाऱ्याने ही तक्रार नोंदवली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, ५ मे रोजी त्यांनी तेलाच्या कंपनीची एक जाहिरात पाहिली, ज्यात सचिन तेंडुलकरच्या फोटोचा नकळत वापर केला गेला होता. sachinhealth.in असं या वेबसाईटचं नाव आहे.

इतकेच नव्हे तर, खाली असे देखील लिहिले गेले होते की, स्वतः सचिन देखील याच प्रोडक्टचा वापर करतो. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा जाहिराती इंस्टाग्रामवर अजूनही सुरु आहेत.

मुंबई क्राईम ब्रांचला दिलेल्या माहितीत त्यांनी असे सांगितले गेले आहे की, सचिन अशा कुठल्याच प्रोडक्टची जाहीरात करत नाही. या जाहीरातीत सचिनच्या आवाजाचा चुकीचा वापर केला गेला आहे.

तसेच त्याच्या फोटोंचा देखील चुकीचा वापर केला आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५ आणि ५०० अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (Latest sports updates)

सचिन तेंडुलकरने २४ वर्ष भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रिय क्रिकेटला राम राम केला होता. सध्या तो मुंबई इंडियन्स संघाचा आयकॉन म्हणून काम करतोय. तसेच तो अनेक जाहिरातींमध्ये देखील झळकताना दिसून येतो. क्रिकटमधून निवृत्त झाला असला तरी देखील त्याच्या ब्रँड व्हॅल्यूला कुठलाच धक्का बसला नाहीये.

त्याची ब्रँड व्हॅल्यू ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जाहिरातींमधून तो कोट्यवधी रुपयांची कमाई करतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकांची तयारी सुरू, राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश, बिगूल कधी वाजणार? VIDEO

Waterfalls near Neral: गर्दी कमी आणि लांब जाण्याचीही गरज नाही! नेरळ-माथेरान जवळ आहेत 'हे' लपलेले धबधबे

Pune Shivneri Bus : दारु पिऊन शिवनेरी चालवत होता, प्रवाशांनी दारुड्या चालकाला रंगेहाथ पकडले अन् पुढे...

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; धाराशिवातील बड्या नेत्याकडून पदाचा राजीनामा

Gaganbawda Tourism: कोल्हापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण, या विकेंडला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT