SA VS WI 2nd T20I Twitter/ICC
Sports

SA VS WI : अद्भुत,अविश्वसनीय कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास! टी-ट्वेंटीमध्ये सर केला २५९ धावांचा डोंगर

South africa record run chase: या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने इतिहासाला गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

SA VS WI 2nd T20I: सध्या वेस्ट इंडिज संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० समान्यांची मालिका सुरु आहे. रविवारी या मालिकेतील दुसरा टी -२० सामना पार पडला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने इतिहासाला गवसणी घातली आहे.

दक्षिण आफ्रिका संघाने या सामन्यात धावांचा पाठलाग करताना मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. दक्षिण आफ्रिका संघाला हा सामना जिंकण्यासाठी २५९ धावांची गरज होती.

या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाने अवघ्या १८.५ षटकात हे आव्हान पूर्ण करत इतिहासाला गवसणी घातली आहे. यापूर्वी कुठल्याही संघाला इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करता आला नव्हता.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

वेस्ट इंडिज संघाकडून प्रथम फलंदाजी करताना जॉनसन चार्ल्सने अवघ्या ३९ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले होते. या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाने २० षटक अखेर ५ गडी बाद २५८ धावांचा डोंगर उभारला होता.

या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाकडून क्विंंटन डी कॉकने सर्वाधिक १०० धावांची खेळी केली.

तर रिझा हेन्ड्रिक्सने ६७ धावांची तुफानी खेळी केली. ७ चेंडू शिल्लक असतानाच दक्षिण आफ्रिका संघाने हा सामना आपल्या नावे केला आहे. यासह ही मालिका १-१ च्या बरोबरीत आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: ६ राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: Mumbai: कांदिवलीत ऑइलमुळे १४ दुचाकींचे अपघात; अनेक जण जखमी!

Health Tips : जेवण करताना वारंवार जीभ दातात का अडकते? जाणून घ्या कारणे आणि आरोग्य टिप्स

मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक-कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, धडकेनंतर उघडलं गांजाचं गुपित

Ladki Bahin Yojana : पात्र आहात पण खात्यावर ₹१५०० येत नाहीत? लाडक्या बहिणींनो हे काम आताच करा

SCROLL FOR NEXT