Ruturaj Gaikwad  Saam Tv
Sports

एमएस धोनीसोबत ट्रेनिंग की सचिनसोबत डिनर? ऋतुराज गायकवाडने दिले मजेशीर उत्तर

ऋतुराज गायकवाडला अजुनही झिम्बाब्वे दौऱ्यावर वनडे मालिकेत खेळण्याची संधी मिळालेली नाही.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: भारतीय संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो अनेक प्रश्नांची झटपट उत्तरे देत असल्याचे दिसत आहे. बीसीसीआयने (BCCI) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ऋतुराज गायकवाडचा हा मजेशीर प्रश्नोत्तराचा व्हिडिओ शेअर केला आहे. ऋतुराजला अगोदर पुण्यातील त्याच्या आवडत्या पदार्थाचे नाव विचारण्यात आली आहेत. यावर त्याने 'डोसा' असे उत्तर दिले.

या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. यानंतर ऋतुराजने अनेक प्रश्नांची मजेशीर उत्तरं दिली आहेत. त्याला क्रिकेट संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आली. यात त्याला जर तु क्रिकेट खेळला नाही तर कोणता खेळ स्वीकारशील?, असा प्रश्न विचारण्यात आला यावर ऋतुराजने टेनिस असे प्रत्युत्तर दिले. गायकवाडला राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यापैकी कोणाकडे प्रशिक्षण घ्यायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने आपल्या कारकिर्दीत २० ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावणाऱ्या रॉजर फेडररचे नाव घेतले.

यावेळी ऋतुराजला (Ruturaj Gaikwad) एमएस धोनीसोबत सराव करायला आवडेल की सचिन तेंडुलकरसोबत डिनर करायला आवडेल असा प्रश्न विचारला, या प्रश्नाने तो चांगलाच पेचात पुडला होता. यावर उत्तर देताना त्याने 'मी आधी धोनीसोबत सराव करेन आणि नंतर सचिन तेंडुलकरसोबत डीनर करेन, असं मजेशीर उत्तर दिले.

ऋतुराज गाकवाड एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकर या दोघांचा मोठा फॅन आहे. जेव्हा जेव्हा या दोघांना भेटण्याची त्याला संधी मिळेल तेव्हा तो भेटतो.

फिरकीपटूंपेक्षा वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यात अधिक आनंद मिळतो. त्याला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडपेक्षा लॉर्ड्सवर खेळायला जास्त आवडेल, असंही ऋतुराज सांगितले. त्याला या मैदानावर कसोटीत पदार्पण करायचे आहे. चेपॉक स्टेडियम ऋतुराज गायकवाडचे आवडते मैदान आहे.

ऋतुराजला इशान किशनसोबत फलंदाजी करायला आवडते. सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे ऋतुराज गायकवाड याचे आवडते क्रिकेटर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाचे राष्ट्रपती Vladimir Putin यांच्या घरावर ड्रोन हल्ला, युद्ध पुन्हा भडकणार?

Maharashtra Live News Update : अकोला महापालिकेत 'भाजप-राष्ट्रवादी' युतीची घोषणा

BMC Election: मुंबई महापालिकेतील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, शिंदेसेना ९० जागा तर भाजपला १३७ जागा

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

SCROLL FOR NEXT