India Vs Pakistan सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा झटका, धाकड खेळाडू आशिया कपमधून बाहेर

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं शनिवारी यासंदर्भात माहिती दिली आहे.
 Pakistan shaheen shah afridi
Pakistan shaheen shah afridiSaam TV
Published On

मुंबई: आशिया चषक स्पर्धा सुरू होण्याआधीच पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानचा स्टार तेजतर्रार गोलंदाज शाहीन आफ्रिदी जायबंदी झाल्यानं स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं शनिवारी यासंदर्भात माहिती दिली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) सांगितलं की, आफ्रिदीच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळं महिनाभर विश्रांतीला सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळं तो आता आशिया चषक स्पर्धा खेळू शकणार नाही. भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधीच पाकिस्तानला (India Vs Pakistan) हा मोठा झटका बसल्याचं मानलं जात आहे. (Asia Cup 2022 India vs Pakistan shaheen shah afridi injured Latest Update)

 Pakistan shaheen shah afridi
Rohit Sharma | भारत-पाकिस्तान सामन्यावर हिटमॅन रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला...

आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup 2022) २८ ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये लढत होणार आहे. हा हायव्होल्टेज सामना होणार असला तरी, पाकिस्तानचा स्टार गोलंदाज या सामन्यात खेळू शकणार नाही.

आशिया चषक स्पर्धाच नाही तर शाहीन आफ्रिदी पुढील महिन्यात पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सात टी-२० सामन्यांच्या मालिकेतूनही बाहेर झाला आहे. शाहीनच्या दुखापतीबाबत पीसीबीने अपडेट दिली आहे. स्कॅन आणि त्याचा रिपोर्ट आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वैद्यकीय सल्लागार समिती आणि स्वतंत्र विशेषज्ज्ञांनी शाहीन आफ्रिदी याला चार ते सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं शाहीनच्या पुनरागमनाबाबतची माहितीही दिली आहे. शाहीन हा आशिया चषक स्पर्धा आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतून बाहेर झाला आहे. ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत तो पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे, असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सांगितलं की, शाहीन सध्या नेदरलँड संघासोबत आपला रिहॅबिलिटेशन पूर्ण कऱणार आहे. त्याच्या जागी संघात कुणाला स्थान देण्यात येईल, याबाबत पीसीबीकडून काहीही सांगण्यात आले नाही. मात्र, लवकरच नवीन खेळाडूची घोषणा करण्यात येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com