rupay prime volleyball league Mumbai Meteors rocked the Calicut Heroes with a thunderous win  saam tv news
Sports

Rupay Volleyball League: तिसऱ्या रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धेत मुंबई मेटीयॉर्सकडून कॅलिकत हिरोजचा पहिला पराभव

Rupay Prime Volleyball League: तिसऱ्या रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धेत मुंबई मेटीयॉर्स संघाने कॅलिकत हिरोज संघावर 15-13, 9-15, 21-19, 15-12 असा विजय मिळवताना महत्वपूर्ण निकालाची नोंद केली.

Ankush Dhavre

Rupay Prime Volleyball League:

तिसऱ्या रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धेत मुंबई मेटीयॉर्स संघाने कॅलिकत हिरोज संघावर 15-13, 9-15, 21-19, 15-12 असा विजय मिळवताना महत्वपूर्ण निकालाची नोंद केली.

ए 23 प्रायोजित ही स्पर्धा जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबई मेटीयॉर्स संघाचा शुभम चौधरी सामन्याचा मानकरी ठरला.

हायदद्रोजन बॉय अजित लाल याने मुंबईला सनसनाटी सुरुवात करून दिली. मात्र सर्व्हिसमध्ये सतत होणाऱ्या चुकांमुळे कॅलिकत संघाला पुनरागमनाची संधी मिळाली. मुंबई संघाने मध्यावरून केलेल्या आक्रमनासाठी कॅलिकतने बचावपटू डॅनियल मोआता झेबी याचा यशस्वी उपयोग केला. याचवेळी शुभमच्या अचूक सर्व्हिसमुळे आणि शमीनने त्याला दिलेल्या साथीमुळे मुंबई संघाने पहिला सेट जिंकून आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटमध्येही झेरोम विनीत व अमित गुलिया यांनी कॅलिकतच्या बचावाची परीक्षा पाहिली. मात्र अश्र्विन राजच्या कल्पक आक्रमणामुळे आणि विकास मानसह तिहेरी बचावामुळे कॅलिकत संघाने दुसऱ्या सेटमध्ये आघाडी घेतली.

लुईस स्पेरेटो याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे कॅलिकतने दुसरा सेट जिंकला खरा, परंतु शुभमच्या सातत्यपूर्ण आक्रमणामुळे आणि सेटर विपुल कुमारच्या पासिंगमुळे मुंबई संघाने लवकरच सामन्यावर पकड मिळवली. कॅलिकतचा सुपर पॉइंट घेण्याचा निर्णय चुकला आणि अमित व शुभम यांनी लागोपाठ गुण मिळवताना मुंबई संघाला चौथ्या सेटसह सामन्यात विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

SCROLL FOR NEXT