Bangladesh Vs Pakistan Salman Ali Agha And Mehidy Hasan Miraz saam tv
Sports

Pak vs Ban : रन आऊटवरून 'रणकंदन'! पाकिस्तान-बांगलादेशी खेळाडूंमध्ये मैदानातच राडा, सलमान आगा भडकला, ग्लोव्ह्ज आपटले, हेल्मेट फेकला

salman ali agha angry after run out in pakistan vs bangladesh odi : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज सलमान अली आगा रन आऊट झाला. या रन आऊटवरून बांगलादेश आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये मैदानातच वाद झाला.

Nandkumar Joshi

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. अर्धशतकी खेळी करत मैदानात तंबू ठोकून उभा असलेला सलमान अली आगा विचित्र प्रकारे रन आऊट झाला आणि तंबूत परतावं लागलं. चूक कुणाची यावरून मेहदी हसन आणि सलमान यांच्यात मैदानातच बाचाबाची झाली. तिसऱ्या पंचांनी बाद घोषित केल्यानंतर सलमान अली आगाने आपल्या हातातील ग्लोव्ह्ज मैदानावर जोरात आपटले. तर रागाने हेल्मेट मैदानावर फेकला आणि पुटपटत पव्हेलियनमध्ये परतला.

दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी रंगात आली होती. सलमान अली आगाने अर्धशतक पूर्ण केले होते. तर रिझवान हा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर होता. संघाने सव्वादोनशेचा टप्पा पार केला होता. मात्र, ३९ व्या ओव्हरमध्ये मैदानात नाट्यमय घडामोडी घडल्या. बांगलादेशचा कर्णधार मेहदी हसन यानं क्रिस सोडलेल्या सलमानला रन आऊट केलं. यावरून मैदानातच वाद झाला. सोशल मीडियावरही यावरून 'स्पोर्ट्स स्पिरिट'च्या मुद्द्यावर चर्चा झडत आहे.

मेहदी-सलमानमध्ये वाद

पाकिस्तानची फलंदाजी होती. ३९ वी ओव्हर होती. हसनने स्ट्राइकवर असलेल्या रिझवानला चेंडू फेकला. त्यानं बचाव करताना तो ऑनसाइडला टोलवला. चेंडू फार वेगात नव्हता. गोलंदाजी करणारा मेहदी हसन मिराज हा चेंडू पकडण्यासाठी धावला. त्यावेळी नॉन स्ट्राइकला असलेला सलमान अली आगा मधोमध आला. दोघांमध्ये किंचित धडकही झाली. सलमानच्या पायाजवळ चेंडू गेला. सलमान तो चेंडू उचलायला गेला. त्यावेळी तो क्रिसच्या बाहेरच उभा होता. सलमान चेंडू उचलणार तोच, मेहदीनं चेंडू उचलून स्टम्पवर फेकला आणि अपील केली. पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला. त्यांनी सलमान अलीला बाद घोषित केलं.

व्हिडिओ बघा : नेमकं काय घडलं?

सलमान चिडला, रागारागातच तंबूत परतला

मी चेंडू उचलून देत होतो, असं सलमाननं बांगलादेशचा कर्णधार मेहदीला सांगण्याचा प्रयत्न केल्याचं व्हिडिओत दिसतं. पण क्रिसच्या बाहेर होता असं मेहदीनं त्याला स्पष्टपणे सांगितलं. तिसऱ्या पंचांनी सलमानला बाद घोषित केल्यानंतर त्याला प्रचंड राग आला होता. त्यानं तो मैदानातच असताना काढला. हातातील ग्लोव्ह्ज मैदानावर आपटले. तर हेल्मेट काढून फेकून दिला. ते पुन्हा उचलून पुटपुटत तो मैदानाबाहेर जाताना दिसत होता. सीमारेषेच्या जवळ आला असताना पुन्हा त्याला राग अनावर झाला आणि त्याने पुन्हा हातातील ग्लोव्ह्ज आणि हेल्मेट मैदानाबाहेर फेकून दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT