RR vs GT 
Sports

RR vs GT : Thank You God ! गिलला जीवनदान मिळताच बहिणीनं देवाचे मानले आभार, रिअॅक्शनचा व्हिडिओ व्हायरल

RR vs GT : शुबमन गिल आणि साई सुदर्शनच्या जोडीनं राजस्थानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळाल्यानंतर त्यांनी धमाकेदार फलंदाजी केली.

Bharat Jadhav

जयपूरच्या मैदानात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सची लढत झाली. राजस्थान संघाचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.पण गुजरात टायटन्सची सलामी जोडी शुबमन गिल आणि साई सुदर्शनच्या जोडीनं त्याचा निर्णय चुकीचा ठरवला. दोघांनी दमदार सुरुवात करून दिली. त्यात राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनीही खराब क्षेत्ररक्षण करत गुजरातच्या दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिलं.

शुबमन गिलला जेव्हा जीवनदान मिळालं तेव्हा त्यांच्या बहिणीने देवाचे आभार मानले. तिची रिअॅक्शन सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. डावातील सातव्या षटकात रियान पराग गोलंदाजी करत होता. त्यावेळी या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर साई सुदर्शनने एक धाव घेत स्ट्राइक शुबमन गिलला दिली.परागच्या गोलंदाजीवर भरघोस धावा मिळवण्यासाठी गिल आक्रमकपणे फलंदाजी करू लागला.

गिलने दुसऱ्या चेंडूवर दोन धाव घेतल्या त्यानंतर शुबमन गिलनं तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला. चौथ्या चेंडूवरही त्याने मोठा फटका मारला. पण तो चेंडू वैभव सूर्यवंशीच्या हातात गेला. परंतु सूर्यवंशीकडून तो झेल सुटला. शुबमन गिलचा झेल सुटताच कॅमेरामनने कॅमेरा स्टॅण्डवर बसलेल्या गिलच्या बहिणीकडे केला. भाऊ आऊट होणार, अशी भीती शहानीज गिलच्या चेहऱ्यावर होती, पण कॅच सुटताच ती आनंदाने नाचू लागली. तिने लागलीच देवाचे आभार मानले.

हा कॅच सुटला त्यावेळी शुबमन गिल १८ चेंडूवर ३३ धावांवर खेळत होता. या संधीचा फायदा उठवत त्याने दमदार अर्धशतक केलं. नाणेफेकीनंतर गुजरातने प्रथम फलंदाजी केली आणि त्यांची सुरुवात चांगली झाली. शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी प्रत्येक गोलंदाजाचा सामना केला. गिलने आक्रमक फलंदाजी करत २९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

दुसऱ्या टोकाकडून सुदर्शननेही षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. गुजरातला सुरुवातीलाच ११ व्या षटकात धक्का बसला जेव्हा साई सुदर्शनला टिक्षणाने बाद केले. सुदर्शनने ३९ धावांची खेळी केली. यानंतर बटलर आणि गिल यांनी डाव सावरला. दोन्ही बाजूंनी जोरदार फलंदाजी केली. १७ व्या षटकात गिलची विकेट पडली. गिलने ५० चेंडूत ८४ धावांची खेळी केली. यानंतर बटलरनेही अर्धशतक ठोकले. ज्याच्या आधारे गुजरातने राजस्थानला २१० धावांचे लक्ष्य दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phone Battery Care: बॅटरी किती टक्के झाल्यावर चार्जिंगवरुन फोन काढायचा?

वाळू माफियांची दादागिरी! महिला तलाठ्याच्या अंगावर घातला ट्रॅक्टर | VIDEO

Snowfall : निसर्गाचा प्रकोप! भीषण बर्फवृष्टीमुळे ६१ जणांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत

Famous Singer Death: प्रसिद्ध गायक काळाच्या पडद्याआड; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: परिवहन मंत्र्यांच्या परळ डेपो पाहणीत एसटीचे चालक वाहक मद्यधुंद अवस्थेत

SCROLL FOR NEXT