IPL 2024 च्या ३० व्या सामना सनरायझर्स हैदराबादसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये होत आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. हैदरबादचा फलंदाज हेडच्या तडाखेबाज खेळीने आरबीसीच्या गोलंदाजांचा घाम फोडला. हेडच्या फटकेबाजीच्या जोरावर हैदराबादच्या संघाने आतापर्यंतचा सर्वात मोठी धावसंख्या उभारलीय. हैदराबादने २८७ धावा करत आरसीबीसमोर २८८ धावांचं आव्हान ठेवलं आहे.
सनरायझर्स हैदराबादसाठी ट्रॅव्हिस हेडने ४१ चेंडूंत ९ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. हेनरिक क्लासेनने ३१ चेंडूत ७ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या. अब्दुल समदने १० चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. एडन मार्करामने १७ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या. अभिषेक शर्माने २२ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या.
या सामन्यात आरसीबीची गोलंदाजी नाकामी ठरली. रीस टोपलीने ६८ धावा दिल्या. यश दयालने ५१ धावा दिल्या. लॉकी फर्ग्युसनने ५२ धावा देत २ बळी घेतले. विजयकुमार विशाकने ६४ धावा दिल्या. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच एका संघाच्या 4 गोलंदाजांनी एकाच सामन्यात ५० पेक्षा जास्त धावा दिल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.