Royal challengers Bangalore star all rounder glenn mazwell took break from IPL 2024 amd2000  Twitter
क्रीडा

RCB,IPL 2024: RCB ला मोठा धक्का! स्टार खेळाडूची IPL मधून अनिश्चित काळासाठी विश्रांती

Royal Challengers Bangalore: आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा स्टारने आयपीएल २०२४ स्पर्धेतून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल २०२४ स्पर्धेतून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान त्याने विश्रांती घेण्यामागचं कारणही सांगितलं आहे. काय आहे कारण? जाणून घ्या.

ग्लेन मॅक्सवेलने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत तुफान फटकेबाजी केली होती. मात्र आयपीएल स्पर्धेत त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. या स्पर्धेत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ६ सामन्यांमध्ये केवळ ३२ धावा केल्या आहेत. यादरम्यान २८ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. म्हणजे उर्वरित ५ सामन्यांमध्ये त्याला केवळ ४ धावा करता आल्या आहेत. त्याची धावसंख्या पाहिली तर त्याने ६ डावात ०,३,३८,०,१,० अशा धावा केल्या आहेत.

ग्लेन मॅक्सवेल फलंदाजीत तर फ्लॉप ठरतोय. यासह त्याला मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवत असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे त्याने क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. सोमवारी (१५ एप्रिल ) सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं. याबाबत त्याने खुलासाही केला. त्याने स्वतःहून संघाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला.

सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला की, ' स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये मी वैयक्तिकरित्या चांगली कामगिरी करू शकलेलो नाही. हा निर्णय घेणं खूप सोपं होतं. मी कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि कोचकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की, आता दुसऱ्या कोणाला तरी संधी द्यायची वेळ आली आहे. मी याआधी देखील अशा परिस्थितीचा सामना केला आहे. अशा स्थितीत खेळून तुम्ही स्वतः ला आणखी खड्ड्यात घालता. मला वाटतं की, हीच मानसिक आणि शारीरिकरित्या विश्रांती घेण्याची योग्य वेळ आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

SCROLL FOR NEXT