WPL 2024 RCB Vs MI x
क्रीडा

WPL 2024 Mi Vs RCB: मुंबई इंडियन्सला ५ धावांनी पराभूत करत RCB ने गाठलं फायनलचं तिकीट

WPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाने वुमन्स प्रीमिअर लीगमध्ये नॉक आऊट सामन्यात मुंबईला पराभतू केलं आहे. हा सामना जिंकत आरसीबीने अंतिम सामन्याच्या फेरीत धडक मारलीय.

Bharat Jadhav

WPL 2024 RCB Won By 5 Runs Against Mumbai Indians:

वुमन्स प्रीमिअर लीगच्या नॉक ऑऊट सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आरसीबीने ५ धावांनी सामना जिंकत मुबंईला स्पर्धेतून बाहेर केलं आहे.वुमन्स प्रीमिअर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबईला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या महिला संघाने मुंबई इंडियन्सला ५ धावांनी मात दिली. हा सामना दिल्लीमधील स्टेडियमवर खेळला गेला.(Latest News)

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाने हा सामना जिंकत अंतिम सामन्याच्या फेरीत धडक मारलीय. दरम्यान एलिमिनेटरचा दुसरा सामना हा दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या दरम्यान होणार आहे. दिल्लीच्या संघाने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावत फायनलच्या सामन्यात आला प्रवेश निश्चित केलाय. मागील वुमन्स आयपीएलमध्ये दिल्ली उपविजेता रहावे लागले होते..

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सुरुवातीला संघासाठी अत्यंत चुकीचा ठरला असं वाटलं होतं.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारण अवघ्या २३ धावांमध्ये संघाने पहिल्या ४ षटकांतच ३ महत्त्वाचे विकेट गमावले होते. आरसीबीच्या संघाने एकामगोमाग विकेट गमावले होते परंतु एलिस पेरीच्या भक्कम खेळीने मुंबईला पराभूत व्हावं लागलं. पेरीने अखेरच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाली. परंतु तिने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं होतं. आरसीबीने २० षटकात ६ विकेट गमावत १३५ धावा केल्या. तर एकट्या पेरीने ५० चेंडूमध्ये ६६ धावा केल्या. पेरीच्या या दमदार खेळीमुळे आरसीबीने हा सामना जिंकला.

मुंबईचा आव्हान पार करण्यात अपयशी

मुंबई इंडियन्सच्या संघासमोर १२० चेंडूमध्ये १३६ धावा जास्त आहेत. परंतु मुंबईचा संघ २० षटकांमध्ये फक्त १३० धावा करू शकला. १३० धावा करताना मुंबईच्या संघाने ६ विकेट गमावल्या. मुंबईकडून फलंदाजी करताना फक्त हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ३३ धावा केल्या. ३३ धावा करण्यासाठी हरमनप्रीत कौरने तब्बल ३० चेंडू खेळले. त्याचा फटका संघाला परभवाच्या रुपाने बसला तर आरसीबीकडून गोलंदाजी करताना श्रेयंका पाटीलने २ विकेट घेतल्या तर एलिसे पेरी, सोफ मोलिनक्स, जॉर्जिया वेअरहॅम आणि भोभमना १-१ विकेट घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT