पाकिस्तान सुपर लीगमध्ये १४ मार्च रोजी झालेल्या सामन्यात मुलतान सुलतान आणि पेशावर जाल्मी हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यादरम्यान मुलतान सुलतानचा कर्णधार मोहम्मद रिझवान अंपायरवर भडकला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या. .('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेत मोहम्मद रिझवान मुलतान सुलतान संघाचं नेतृत्व करतोय. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना संघाने शानदार कामगिरी करत स्पर्धेची फायनल गाठली आहे. हा सामना १८ मार्च रोजी कराचीमध्ये रंगणार आहे.
या स्पर्धेतील क्वालिफायर सामन्यात मुलतान सुलतानच्या संघाने बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पेशावर जाल्मी संघाचा ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात मुलतान सुलतानच्या विजयापेक्षा मोहम्मद रिजवानच्या वादाचीच जास्त चर्चा रंगली. तर झालं असं की, ११ वे षटक टाकण्यासाठी खुशदिल शाह गोलंदाजीला आला. त्यावेळी फलंदाजी करत असलेल्या कोहलर-कॅडमोर डीप फाईन लेगच्या दिशेने शॉट खेळला. हा चेंडू पकडण्यासाठी यष्टीरक्षण करत असलेला मोहम्मद रिजवान स्वत: धावला. चेंडूच्या मागे धावत असताना त्याने ग्लोव्ह काढून ठेवले. तो धावला, त्याने चेंडू पकडला. मात्र फेकलेला चेंडू त्याच्या ग्लोव्हला जाऊन लागला.
चेंडू ग्लोव्हला जाऊन लागल्याने अंपायरने क्षणाचाही विलंब न करता हात वर उचलला आणि ५ धावांच्या पेनल्टीचा इशारा केला. नियमानुसार यष्टीरक्षक आपले ग्लोव्ह किंवा कोणतीच वस्तू मैदानावर सोडू शकत नाही. यानंतर रिझवान बराचवेळ अंपायरसोबत वाद घालत होता. अंपायर त्याला नियम समजावून सांगत होते. मात्र तरीही तो वाद घालत होता. त्याच्या या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून नेटकरी देखील प्रतिक्रिया देत आहेत.
मुलतान सुलतानचा पेशावर जाल्मी संघावर विजय :
बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पेशावर संघाने पहिल्या डावात १४६ धावा केल्या. या धावांना प्रत्युत्तर देत मुलतान सुलतान संघाने ९ चेंडू राखून लक्ष्य पूर्ण केलं. या सामन्यात यासिर खानने धमाकेदार फलंदाजी करत ५४ धावा केल्या, तर गोलंदाजी करतान उसमा मीरने २ विकेट घेतल्या.
मोहम्मद रिझवान काही काळापूर्वी चर्चेत आला होता. त्याने गाझाच्या समर्थन करणारं एक ट्वीट केलं होते. ज्या घटनेमुळे त्याच्यावर नेटकऱ्यांनी बरीच टीका केली होती. पीएसएलचा अंतिम सामना १८ मार्चला खेळला जाणार आहे. या हंगामा कोणता संघ जेतेपद पटकावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.