pbks vs rcb saam tv
Sports

PBKS VS RCB Result: हातातून निसटणारा सामना सिराजने पलटवला! थरारक सामन्यात २४ धावांनी विजय

PBKS vs RCB: आयपीएल २०२३ स्पर्धेतील २७ वा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

Ankush Dhavre

IPL 2023 LIVE UPDATES: आयपीएल २०२३ स्पर्धेतील २७ वा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या रोमांचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत २४ धावांनी विजय मिळवला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने केल्या होत्या १७४ धावा..

या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील फलंदाजांनी जोरदार सुरुवात केली होती.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांच्यात १३७ धावांची भागीदारी झाली. यादरम्यान विराट कोहलीने ५९ तर फाफ डू प्लेसिसने ८४ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ४ बाद १७४ धावा केल्या होत्या. (Latest sports updates)

पंजाबचे फलंदाज ठरले फ्लॉप..

पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७५ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले.

शेवटी फलंदाजी करण्यासाठी आलेल्या जितेश शर्माने देखील अप्रतिम फलंदाजी केली. एकीकडे पंजाबचे एकापाठोपाठ विकेट्स जात असताना, जितेशने एक बाजू सांभाळून अप्रतिम फलंदाजी केली.

अशी होती दोन्ही संघांची प्लेइंग ११:

पंजाब किंग्ज:

अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:

विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्तर प्रदेशात निवडणुकीची तयारी नेमकी कुठपर्यंत? आयोग घेणार 18 जिल्ह्यांचा आढावा

Maharashtra News Live Update: Mumbai: सांगली जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ९४ टक्के मतदानाची नोंद.

५ मिनिटांत एकाच रस्त्यावर १४ अपघात; मुंबईतील घटनेने खळबळ

Home Decor : घरात बसवा या रंगाच्या टाईल्स, साफ-सफाई टेन्शनच होईल दूर

Fridge Cleaning Tips: दिवाळीआधी घरातील फ्रिज कसा स्वच्छ करायचा? सोप्या 5 टिप्स जाणून घ्या

SCROLL FOR NEXT