Rohit Sharma - Virat Kohli /File SAAM TV
Sports

Rohit Sharma - Virat Kohli : रोहित शर्मा, विराट कोहलीला टी २० मधून मिळणार डच्चू? BCCI चा प्लान समोर?

टीम इंडियाच्या टी २० संघातून रोहित शर्मा, विराट कोहली आणि सीनिअर्सना वगळणार का?

Nandkumar Joshi

Rohit Sharma - Virat Kohli, Team India : रोहित शर्मा, विराट कोहली आणि इतर वरिष्ठ खेळाडू पुढच्या वर्षी टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतील का? याबाबत शंका आहे. कारण बीसीसीआयच्या सूत्रांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्यानं पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे. त्यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा, आर. अश्विन यांसह इतर वरिष्ठ खेळाडू पुढील वर्षी टी २० संघात नसतील अशीच चिन्हे आहेत.

बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, टी २० वर्ल्डकप २०२४ करिता टीम इंडियाची नव्याने बांधणी होणार आहे. या संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे दिले जाऊ शकते. त्यामुळं भविष्यात हार्दिक पंड्या हा मर्यादित षटकांच्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये कर्णधाराच्या भूमिकेत असू शकतो, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. (Latest Marathi News)

पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले की, बीसीसीआयने कोणत्याही खेळाडूला निवृत्ती घेण्यास सांगितले नाही. तो त्या खेळाडूंचा स्वतःचा निर्णय असणार आहे. मात्र, २०२३ मधील टी २० सामन्यांचे शेड्युल बघता बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना वनडे आणि कसोटी सामन्यांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले जाऊ शकते. जर एखादा वरिष्ठ खेळाडू निवृत्ती घेऊ इच्छित नसेल तर, पुढील वर्षी बहुतांश खेळाडू टी २० संघात दिसू शकणार नाहीत, असे दिसते. (Sports News)

वरिष्ठ खेळाडू वनडे सामन्यांवर लक्ष केंद्रीत करणार

टी २० वर्ल्डकप २०२४ मध्ये होणार आहे. त्याआधी वनडे वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी भारतात ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये होईल. या वर्ल्डकप स्पर्धेआधी टीम इंडिया जवळपास २५ वनडे सामने खेळणार आहे. या सामन्यांत वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडूंना खेळवण्यावर भर दिला जाऊ शकतो.

वनडे वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी व्हावी हा त्यामागचा उद्देश असेल. याबाबतीत भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही त्यांचे मत मांडले आहे. सध्या टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये वनडे मालिका खेळत आहे. भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, बांगलादेश दौऱ्यात हे सर्व जण टीम इंडियामध्ये दिसतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort History: रायगड किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Shweta Tiwari: मुंबईत कुठे राहते श्वेता तिवारी? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांविषयी बोलताना आमदार सदाभाऊ खोत धाय मोकलून रडले|VIDEO

Maharashtra Politics: महायुतीमध्ये ठिणगी! जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील यांच्यात खडाजंगी

SCROLL FOR NEXT