india vs pakistan twitter
Sports

IND vs PAK: भारत- पाक सामन्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! समोर आलं मोठं कारण

India vs Pakistan, ICC T20 World Cup 2024: येत्या ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील बहुप्रतिक्षित भारत - पाकिस्तान सामना ९ जून रोजी खेळला जाणार आहे. हा सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होईल. तर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.

या सामन्यापूर्वी खेळपट्टीवरून जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. या खेळपट्टीवरून अनेक दिग्गज खेळाडूंनी टीका देखील केली आहे. दरम्यान श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यानंतर भारतीय संघाच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. काय आहे कारण? जाणून घ्या.

आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात श्रीलंकेचे फलंदाज संघर्ष करताना दिसून आले आहेत. याच मैदानावर भारत आणि पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्यात गोलंदाजांसमोर फलंदाजांची पळता भुई थोडी झाली. त्यामुळे केवळ भारतीय संघच नव्हे तर पाकिस्तानच्या फलंदाजांचं देखील टेन्शन वाढलं असेल. भारत-पाकिस्तान सामन्यात गोलंदाजांची चांदी होणार की फलंदाज बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारतीय संघाचा प्लस पॉइंट म्हणजे रोहित शर्माने टी-२० वर्ल्डकपसाठी ४ अनुभवी फिरकी गोलंदाजांना संघात स्थान दिल आहे. आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला तर फिरकी गोलंदाजांच्या गोलंदाजीवर फलंदाज अडचणीत सापडताना दिसून आले आहेत. त्यामुळे फिरकी गोलंदाज संघात असण्याचा भारतीय संघाला नक्कीच फायदा होऊ शकतो. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. हा सामना देखील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यातही भारतीय संघाकडे खेळपट्टीचा अंदाज घेण्याची संधी असणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकासभाई सावंत यांच निधन

भयंकर! शायनिंग मारायला गेला अन् ट्रेनच्या खाली चिरडला, २ किमीपर्यंत फरफटत गेला, पण... व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल

India First Car: भारतात पहिली कार कधी आली? जाणून घ्या इतिहास

GK: वॉश बेसिनचा रंग नेहमीच पांढरा का असतो?

Central Railway : मुंबईत पावसाची जोरदार हजेरी! मध्यरेल्वे अर्धा तास उशिराने; प्रवाशांची तारांबळ | VIDEO

SCROLL FOR NEXT